
रब्बी (उन्हाळी) कांद्याची लागवड साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये केली जाते. एक हेक्टर लागवडीसाठी साधारणतः ८-१० किलो बियांची रोपवाटिका पुरेशी होते. रोपे ८-९ आठवड्यांची झाल्यानंतर त्यांची १५ × १० सेंमी अंतरावर पुनर्लागवड करतात. फेब्रुवारी ते मार्च या काळात दिवसाच्या तापमानात वाढ होते. या दरम्यान कांदा चांगला तयार होतो. त्याच्या माना पडतात. काढणीनंतर सुकवणी चांगल्या प्रकारे होते. कांदे वजनाने जास्त भरल्याने उत्पादन चांगले मिळते. मात्र या हंगामात डेंगळे व जोडकांदे यांचे प्रमाण वाढते. कांदा पिकाची मुळे उथळ असल्याकारणाने कांदा पिकात योग्य वेळी खते देणे आवश्यक आहे. नत्र विभागून दोन ते तीन हप्त्यांत दिले असता त्याचा चांगला फायदा होतो. कांदा पिकास तांबे, लोह, जस्त, मँगेनीज या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज भासते. त्यानुसार खत व्यवस्थापन करणे फायद्याचे ठरते. खत व्यवस्थापन (प्रति एकर) रोपे रुजण्याची अवस्था (लागवडीच्या वेळी)
सुरुवातीच्या वाढीची अवस्था (लागवडीनंतर ३० दिवसांनी)
जोमदार वाढीची अवस्था (लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांनी) अ) लागवडीनंतर ४५ दिवसांनी : सल्फेट ऑफ पोटॅश (फिल्डग्रेड) २० किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे. (म्युरेट ऑफ पोटॅश) पिकाच्या जोमदार वाढीच्या अवस्थेतील पालाशची गरज सल्फेट ऑफ पोटॅश भागवते. ब) लागवडीनंतर ६० दिवसांनी : ००:५२:३४ हे खत ४ ग्रॅम अधिक सूक्ष्म अन्नद्रव्ये १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. या फवारणीमुळे कंद पोषणाच्या काळात सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासत नाही. या काळात जैव रासायनिक क्रिया घडत असतात. या फवारणीमुळे कंदाचा आकार वाढतो. कंद घट्ट होतात. कंद वाढीची अवस्था (लागवडीनंतर ७५ ते १०५ दिवसांनी) या अवस्थेत ००:००:५० हे खत ५ ग्रॅम अधिक बोरॉन २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. ००:००:५० या खतामुळे कांदे पक्व होण्यास मदत होते. बोरॉनमुळे पानात तयार झालेली शर्करा कंदामध्ये उतरते. कंदातील शर्करेचे प्रमाण (टीएसएस) वाढते. कांद्याची गुणवत्ता सुधारते. तसेच साठवण कालावधीदेखील वाढतो. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन १) कांदा पिकाची मुळे उथळ असतात. त्यामुळे कांदा पिकात योग्य वेळी, विभागून खते देणे आवश्यक असते. अपेक्षित उत्पादनासाठी हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत वापरल्यास कांद्याची साठवण क्षमता वाढते. २) रब्बी कांद्यासाठी नत्र १०० किलो (युरिया २१७ किलो), स्फुरद ५० किलो (सिंगल सुपर फॉस्फेट ३१३ किलो) आणि पालाश ५० किलो (म्युरेट ऑफ पोटॅश ८३ किलो) प्रतिहेक्टर द्यावे. त्या पैकी अर्धे नत्र (५० किलो - युरिया १०९ किलो), पूर्ण स्फुरद आणि पालाश पुनर्लागवडीच्या वेळी द्यावा. उर्वरित नत्र (५० किलो - युरिया १०९ किलो) पुनर्लागवडीनंतर १ आणि दीड महिन्याने समान हप्त्याने द्यावा. ३) पुनर्लागवडीनंतर वाढीच्या सुरुवातीला तसेच कांदा पूर्ण वाढत असताना (म्हणजेच दोन महिन्यांपर्यंत) नत्राची आवश्यकता अधिक असते. मात्र पूर्ण वाढल्यानंतर नत्राची आवश्यकता नसते. पूर्ण वाढल्यानंतर नत्र दिल्यास किंवा उशिरा दिल्यास डेंगळे व जोडकांदा येणे व साठवणीत कांदा सडणे अशा समस्या उद्भवतात. ४) पिकांच्या मुळांच्या वाढीकरिता स्फुरदाची आवश्यकता असते. ५) जमिनीत पालाशचे प्रमाण भरपूर असले, तरी पिकांना उपलब्ध होणाऱ्या पालाशची मात्रा कमी आहे. पालाश कांद्याचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी, कांद्याला आकर्षक रंग येण्यासाठी आवश्यक असतो. ६) माती परीक्षण करून, त्या अहवालाप्रमाणे तज्ज्ञांच्या साह्याने खताची मात्रा ठरवावी. कांदा पिकास शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा जास्त व लागवडीच्या ६० दिवसांनंतर नत्र दिल्यास कांद्याची पात जास्त वाढते, मान जाड होतात. जोड कांद्याचे प्रमाण जास्त निघते. साठवण क्षमता कमी होते.
कांदा पिकात गंधकाचे महत्त्व
सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज
- रवींद्र जाधव, ९४०३०१६१०१ (लेखक कृषी, अभियांत्रिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे आचार्य पदवी घेत आहेत.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.