मृग बहार डाळिंब बागेसाठी नियोजन

लवकर मृग बहार घेतलेल्या बागेमध्ये फळ पूर्ण पक्व होऊन सालीचा व दाण्यांचा रंग विकसित झाला असल्यास, फळगळ आणि बुरशीचे डाग टाळण्यासाठी वेळेत फळ तोडणी करावी.
मृग बहार डाळिंब बागेसाठी नियोजन
मृग बहार डाळिंब बागेसाठी नियोजन

मृग-बहार (i) मे-जून बहार नियमन (ii) उशिरा मृग बहार (जुलै बहार नियमन) पिकाची अवस्था - फळ वाढ आणि पक्वता बागेची मशागत :

  • फळबागेतून पाण्याचा संपूर्ण निचरा झालेला असावा. जास्त पावसामुळे झाडांच्या मुळांच्या जवळ पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • फळांनी भरलेल्या फांद्यांना आधार देण्यासाठी योग्य स्टॅकिंग किंवा आधार करावा.
  • फळांच्या योग्य वाढ व वजन मिळण्यासाठी गुच्छामधील जास्त आणि गरजेपेक्षा अधिक फळे काढावीत. पाच वर्षांच्या झाडासाठी प्रति झाड सुमारे ८० ते १०० फळे घ्यावीत.
  • जास्त आर्द्रतेमुळे फळे गळण्याची समस्या उद्भवू शकते. तसेच फळांची परिपक्वता आणि चांगला रंग येण्यास थोडा विलंब होऊ शकतो.
  • लवकर मृग बहार घेतलेल्या बागेमध्ये फळ पूर्ण पक्व होऊन सालीचा व दाण्यांचा रंग विकसित झाला असल्यास, फळगळ आणि बुरशीचे डाग टाळण्यासाठी वेळेत फळ तोडणी करावी.
  • अन्नद्रव्य व्यवस्थापन :

  • ००:५२:३४ (मोनो पोटॅशियम फॉस्फेट) १० ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे - १५-२० दिवसांच्या अंतराने ३ फवारण्या.
  • मॅंगेनीज सल्फेटच्या ६ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे - १०-१५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या.
  • प्रति हेक्टरी विद्राव्य एन.पी.के. ००:५२:३४ (मोनो पोटॅशियम फॉस्फेट) १२.८० किलो + युरिया ३१.४० किलो प्रति हेक्टर + ००:००:५० (पोटॅशिअम सल्फेट) ११.५० किलो याप्रमाणे - ७ दिवसांच्या अंतराने १० वेळा ड्रिपद्वारे द्यावे.
  • कीड व्यवस्थापन पिकाची अवस्था- फळ पक्वता १) रस शोषणारा पतंग

  • गुळवेल बागेतून किंवा बांधावरून काढून टाकावेत.
  • फळांचे रस शोषणाऱ्या पतंगामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी फळांना पॉलिप्रोपीलीन नॉन ओव्हन किंवा बटर पेपर बॅगने झाकावे. झाकण्यापूर्वी तेलकट डाग, पिठ्या ढेकूण किंवा बागेतील किडींचा प्रादुर्भाव विचारात घेऊन प्रथम नियंत्रण करून घ्यावे.
  • जर फळांना बॅग लावण्यास उशीर होत असल्यास, ॲझाडिरेक्टीन/ निम तेल (१%) १० हजार पी.पी.एम. ३ मि.लि. प्रति लिटर + फिश ऑइल रेझिन सोप ०.५ ते १ मि.लि. प्रति लिटर प्रमाणे बांधाकडील झाडांवर फवारावे.
  • २) फळ माशी : फळमाशीसाठी बागेत १२ पाण्याच्या सछिद्र रिकाम्या बंद बाटल्यांचा वापर करून टोरूला इस्ट किंवा बॅक्ट्रोसेरा गंध (ल्यूर) पासून सापळे बनवावेत. ते बागेत विविध ठिकाणी टांगावेत. त्यातील गंध (ल्यूर) प्रत्येक १५-२० दिवसाला बदलावेत. ३) सदर्न स्टींक बग फवारणी प्रति लिटर पाणी

  • अंडी अवस्था : ॲझाडिरेक्टीन/ निम तेल (१%) १० हजार पी पी एम) ३ मि.लि. + करंज बियाचे तेल ३ मि.लि. + स्प्रेडर स्टीकर ०.२५ मि.लि.*
  • पिल्ले व प्रौढ : सायॲन्ट्रानिलीप्रोल (१०.२६% ओडी) ०.७५ मि.लि. किंवा क्लोरॲन्ट्रानिलिप्रोल (१८.५% एससी) ०.७५ मि.लि. किंवा स्पिनेटोराम (१२ % एससी) १ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ % ईसी) ०.५ ते ०.७५ मि.लि. + स्प्रेडर स्टिकर ०.२५ मि.लि.
  • ------ दिनकर चौधरी, ९४०३३९०६२७ (राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर.) (* एनआरसीची शिफारस)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com