कृषी सल्ला (आंबा, काजू, नारळ, सुपारी, चिकू, मधुमका, कलिंगड)

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात दिनांक १७ जानेवारीपर्यंत कमाल व किमान तापमानात १ ते २ अंश.सेल्सिअस. इतकी घट संभवते. १६ जानेवारीपर्यंत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
agri advisory by dapoli university
agri advisory by dapoli university

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात दिनांक १७ जानेवारीपर्यंत कमाल व किमान तापमानात १ ते २ अंश.सेल्सिअस. इतकी घट संभवते. १६ जानेवारीपर्यंत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. आंबा

 • मोहोर ते फळधारणा अवस्था
 • मागील आठवड्यापासून असलेले ढगाळ व पावसाळी वातावरण आणि पुढील चार दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. यामुळे आंबा पालवी आणि मोहोरावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो.
 • प्रतिबंधात्मक उपाययोजना

 • करपा रोगः  कार्बेन्डाझिम (१२%) अधिक मॅन्कोझेब (६३%) (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
 • बोंगे फुटण्याच्या अवस्थेत असलेल्या आंब्यावर तुडतुडे, फुलकीड आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
 • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. अधिक हेक्झाकोनॅझोल (५% प्रवाही) ०.५ मि.लि. किंवा गंधक ((पाण्यात विरघळणारे ८० टक्के) २ ग्रॅम.
 • -मोहोर फुटलेल्या आंबा बागेमध्ये मोहोरावर तुडतुडे, मिजमाशी किडींचा प्रादुर्भाव दिसत असल्यास, नियंत्रणासाठी मोहोर फुलण्यापूर्वी फवारणी प्रति लिटर पाणी
 • इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मि.लि.
 • भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
 • हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ०.५ मि. लि. किंवा
 • गंधक (पाण्यात विरघळणारे ८० टक्के ) २ ग्रॅम.
 • टीप मोहोर नुकताच फुलत असताना ते फलधारणा होईपर्यंत कीटकनाशकाची फवारणी टाळावी. फवारणी करणे गरजेचीच असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाचा कालावधी वगळून फवारणी करावी. शक्यतो सकाळी ९ ते १२ किंवा सायंकाळी ३.०० वाजल्यानंतर फवारणी करावी. या आधीच फवारणी घेतली असल्यास कीड व रोगाच्या प्रादुर्भावाकडे झाडाचे निरीक्षण करावे. प्रादुर्भाव दिसून आल्यास उपाययोजना कराव्यात.

 • आंबा फळधारणा होऊन वाटाणा आकाराच्या अवस्थेत असताना फळांवर तुडतुड्याचा, फुलकिडीचा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
 • मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार चौथी फवारणी (तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने) प्रमाण ः प्रति लिटर पाणी
 • थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यु.जी.) ०.१ ग्रॅम अधिक भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल (५ टक्के ) ०.५ मि. लि. किंवा गंधक (पाण्यात विरघळणारे ८० टक्के) २ ग्रॅम.
 • या फवारणीमध्ये फळगळ कमी करण्यासाठी युरिया (२ टक्के ) (२० ग्रॅम युरिया प्रति लिटर पाणी) पाण्यातून) मिसळता येईल.
 • हे द्रावण तयार करताना प्रथम युरिया पाण्यात पूर्णपणे विरघळून घ्यावा. नंतर त्यात कीटकनाशक मिसळावे.
 • पुढील काही दिवसामध्ये आर्द्रतेत घट होण्याची शक्यता आहे. फळधारणा झालेल्या आंबा बागेमध्ये फळगळ कमी करण्यासाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.
 • काजू

 • मोहोर ते फळधारणा
 • मोहोर अवस्थेत असलेल्या काजू पिकावर ढेकण्या व फुलकिडींच्या वाढीसाठी हवामान अनुकूल दिसत आहे. या किडींच्या बंदोबस्तासाठी मोहोर फुटण्याच्या वेळी फवारणी प्रति लिटर
 • प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १ मि.लि.
 • ​फळधारणा झालेल्या काजूवरील ढेकण्या व फुलकिडीच्या नियंत्रणासाठी,

 • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. किंवा
 • ॲसिटामिप्रीड (२० टक्के एसपी) ०.५ ग्रॅम. (सदर कीटकनाशकास लेबल क्लेम नाहीत. ॲग्रेस्को शिफारस आहे.)
 • या आधी फवारणी घेतली असल्यास कीड व रोगाच्या प्रादुर्भावाकडे लक्ष ठेवावे. प्रादुर्भाव दिसून आल्यावरच उपाययोजना कराव्यात.
 • टीप ढेकण्या कीड सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी सक्रिय असते. किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी फवारणी शक्यतो सकाळी १० पूर्वी किंवा सायंकाळी ४ वाजल्यानंतर करावी. नारळ

 • फळधारणा
 • आर्द्रतेत घट संभवते. नवीन लागवड केलेल्या नारळ बागेत तीन ते चार वर्षे वयापर्यंतच्या माडांना ६ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. पूर्ण वाढलेल्या माडांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. आळ्यांमध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाच्या शेंड्या पुराव्यात आणि झावळ्यांचे आच्छादन करावे.
 • सुपारी

 • फळधारणा
 • सुपारीला खते द्यावयाची राहिली असल्यास खताची मात्रा देऊन घ्यावी.
 • ३ वर्षावरील प्रत्येक झाडास १६० ग्रॅम युरिया आणि १२५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश असा खताचा दुसरा हप्ता झाडाच्या बुंध्यापासून १ मीटर अंतरावर बांगडी पद्धतीने चर खोदून द्यावा. नंतर चर बुजवून घ्यावा. तीन वर्षापेक्षा कमी वयाच्या लागवडीस देताना पहिल्या वर्षी १/३ पट आणि दुसऱ्या वर्षी २/३ पट या प्रमाणे कमी करून द्यावी.
 • सुपारी बागेस ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
 • चिकू

 • फळधारणा
 • चिकूच्या १ वर्षे वयाच्या प्रति कलमास ५ किलो शेणखत, १५० ग्रॅम युरिया, ४५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि १५० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खताचा दुसरा हप्ता द्यावा. कलमाच्या विस्ताराच्या थोडेसे आत बांगडी पद्धतीने चर खोदून खते गाडून द्यावीत.
 • पहिल्या वर्षी दिलेल्या खताच्या मात्रेच्या दुसऱ्या वर्षी दुप्पट, तिसऱ्या वर्षी तिप्पट या प्रमाणे वाढवून २० वर्षापर्यंत २० पट खताचा हप्ता द्यावा. २० वर्षानंतर प्रती कलमास १०० किलो शेणखत, ३ किलो युरिया, ९ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश खताचा दुसरा हप्ता देण्यात यावा.
 • चिकू बागेस ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
 • मधुमका

 • वाढीची अवस्था
 • मधुमक्यावर लष्करी अळीचा (फॉल आर्मीवर्म) प्रादुर्भाव दिसून येत आहे. किडीच्या प्रथमावस्थेतील अळ्या पाने कुरतडतात. पुढील अवस्थेतील अळ्या पानाच्या पोंग्यात राहून पाने खातात. परिणामी पान पूर्ण उघडल्यावर त्यात छिद्रे दिसून येतात. एका रोपामध्ये १ ते २ अळ्या असू शकतात. अळीची विष्ठा पानाच्या पोंग्यामध्ये दिसून येते. या किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
 • क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) ०.४ मि.लि.
 • फवारणीचे द्रावण पोंग्यामध्ये पडेल असे पहावे.
 • टीप रासायनिक कीटकनाशकाचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी असलेल्या व फुलोरा आणि कणसे धरण्याच्या अवस्थेतील मका पिकावर करू नये. कलिंगड

 • फळधारणा
 • फळधारणा अवस्थेत असलेल्या कलिंगड पिकाला ३ ते ४ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. पाण्याच्या अनियमित पाळ्या दिल्यावर फळे तडकण्याची शक्यता असते.
 • कुकुटपालन

 • बर्ड फ्लू या विषाणूजन्य रोगाचा प्रसार टाळण्यासाठी कुकुटपालनाच्या शेड व आवारात १ टक्का सोडियम हायपोक्लोराईट द्रावणाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करावे.
 • शेडमधील भितींना चुना लावावा.
 • गादी पद्धतीने (डीप लिटर) पक्ष्यांचे संगोपन करत असलेल्या ठिकाणी गादी निर्जंतुकीकरणासाठी व गादीतील ओलावा कमी करण्यासाठी २ टक्के चुना गादीत मिसळावा.
 • पक्षी अन्य वन्य पक्षांच्या संपर्कात येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
 • पक्ष्यांना पिण्यासाठी स्वच्छ आणि निर्जंतुक केलेल्या पाण्याची व्यवस्था करावी.
 • संपर्क ः ०२३५८- २८२३८७ डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१ (कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com