शाश्‍वत विकासासाठी एकात्मिक शेती पद्धती

ग्रामीण भागामध्ये काही पिके, त्यावर आधारित पशू-पक्षिपालन, छोटेमोठे व्यवसाय अशी एकमेकांमध्ये गुंफलेली, एकमेकांवर अवलंबून, एकमेकांशी जोडलेली संरचना निर्माण झालेली असते. त्याला एकात्मिक शेती पद्धती असे म्हणतात.
Integrated farming practices for sustainable development
Integrated farming practices for sustainable development

ग्रामीण भागामध्ये काही पिके, त्यावर आधारित पशू-पक्षिपालन, छोटेमोठे व्यवसाय अशी एकमेकांमध्ये गुंफलेली, एकमेकांवर अवलंबून, एकमेकांशी जोडलेली संरचना निर्माण झालेली असते. त्याला एकात्मिक शेती पद्धती असे म्हणतात. ग्रामीण भागामध्ये काही पिके, त्यावर आधारित पशू-पक्षिपालन, छोटेमोठे व्यवसाय अशी एकमेकांमध्ये गुंफलेली, एकमेकांवर अवलंबून, एकमेकांशी जोडलेली संरचना निर्माण झालेली असते. त्याला एकात्मिक शेती पद्धती असे म्हणतात.थॉमस जेफरसन यांच्या मते, ‘‘शेती हा आपला सर्वांत शहाणपणाचा व्यवसाय असून, त्यातून अंतिमतः सर्वांत खऱ्या संपत्तीची, नैतिक मूल्यांची आणि आनंदाची निर्माण होत असते.’’ अशा एकमेकांवर अवलंबून असलेल्या शेतीला एकात्मिक जैव प्रणाली किंवा शेती म्हणून ओळखले जाते. सुयोग्य प्रकारे एकात्मिक शेती पद्धतीतून माती, पर्यावरण आणि एकूणच आसमंतावर होणाऱ्या विपरीत परिणामांचे विरेचन होत असते. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनशैलीमध्ये ती आजवर मुरून गेली होती. मात्र दरडोई शेतीचे क्षेत्र कमी होत असून, भारतातील ८२ टक्के शेतकऱ्यांकडे २.५ एकरांपेक्षाही कमी जमीन राहिली आहे. या स्थितीमध्ये अधिक अन्नाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने १९६० नंतरच्या काळामध्ये हे एकमेकांमध्ये गुंफलेले धागे नव्या पद्धती, तंत्रज्ञान आणि यांसारख्या विविध कारणांमुळे विरळ होत गेले. या शेतकऱ्यांकडे बियाणे, खते, कीडनाशके अशा निविष्ठांच्या खरेदीसाठी किंवा आवश्यकतेनुसार मजुरी देण्यासाठीही ऐपत राहिलेली नाही. हे केवळ भारतात झाले असे नाही, तर जगाच्या विविध भागांमध्ये हेच परिणाम दिसून येत आहेत. भारतामध्ये एकात्मिक शेतीही काही नवीन नाही. ती पूर्वापार आपल्या जीवनशैलीचा एक भाग होती. आत्यंतिक रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती या दरम्यान एक प्रारूप विकसित करण्याचा पर्यायी प्रयत्न १९४३ च्या सुमारापासून सुरू झाला. मात्र त्याचा योग्य विकास आणि डोळस अंगीकार याकडे दुर्लक्ष झाले.

  • २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रक्रियेमध्ये याचा समावेश केला पाहिजे. त्यातून शेती हा एक फायदेशीर व्यवसाय होत शकत असल्याचे मत मणिपूर येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलगुरू एम. प्रेमजित यांनी मांडले होते. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या २.६ हेक्टर क्षेत्रातून वार्षिक १६ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न एकात्मिक शेती पद्धतीतून मिळू शकते. आपण मधमाश्‍यांना आणि मधमाशीपालकांना शेतीतून वगळले तर शेतीचे उत्पादन कसे वाढणार? आपण आजवर प्रत्येक गोष्ट वेगळी वेगळी पाहत आलो आहोत.
  • मेघालयातील केंद्रीय कृषी विद्यापीठातील अधिष्ठाता यू. के. बेहेरा यांनी आपल्या लेखात नोंदवलेल्या माहितीनुसार, एकात्मिक शेती पद्धती हे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे साधन ठरणार आहे. यातून शेती पद्धतीची कार्यक्षमता २ ते ३ पटीने वाढून, विविध स्रोतांमध्ये ४० ते ६० टक्क्यांपर्यंत घट होणार आहे. ग्रामीण भागामध्ये रोजगाराची उपलब्धता होण्यासोबत कुटुंबाच्या पोषकतेची सुरक्षितताही साधणार आहे.
  • कृषी शास्त्र संचालनालयाचे सदस्य असलेल्या डॉ. व्ही. एल. मधुप्रसाद हे आधुनिक एकात्मिक शेती पद्धतीचे जनक मानले जातात. आंतरराष्ट्रीय मानक व मानांकन संस्थांनी त्यांचा या कामासाठी सन्मान केला आहे.
  • भारत सरकारने २०२०-२१ चा आर्थिक वर्षासाठी २०२.५ कोटी रुपयांची तरतूद एकात्मिक शेती पद्धतीच्या प्रसारासाठी ठेवली होती.
  • जागतिक पातळीवरील एकात्मिक शेती अनेक युरोपिय आणि आशियायी देशांमध्ये एकात्मिक शेती पद्धती विकसित झाल्या आहेत. त्यातील अनेक पद्धती सद्यःस्थिती आणि भविष्यात येऊ घातलेल्या हवामान बदलाच्या संकटामध्ये अधिक लोकसंख्येसाठी अन्नधान्य उत्पादनाच्या अनुषंगाने उपयुक्त ठरणार आहेत. आशिया आणि आफ्रिकेतील शेतकऱ्यांनी पशुपालनाची सांगड शेतीशी घातली आहे. त्यातून त्यांच्या उत्पन्नामध्ये शाश्‍वत वाढ झाली आहे. सामान्यतः एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यानंतर दोन ते तीन वर्षांमध्ये मातीची सुपीकता वाढून उत्पादनामध्ये वाढीला सुरुवात होते. त्याची बाजारपेठेशी सांगड घातल्यास कुटुंबाच्या उत्पन्नांमध्ये वाढ होते. पोषकतेची गरज चांगल्या प्रकारे भागू शकते. एकात्मिक शेतीची वैशिष्ट्ये

  • स्थाननिहाय पर्यावरणपूरक बदल
  • संवर्धन प्रणाली
  • जैविक खतांचा वापर
  • पीक बदल
  • शून्य मशागत तंत्र
  • रासायनिक खते, कीटकनाशकांचा किमान किंवा शून्य वापर.
  • संकल्पना 

  • शेतीसोबत पशुपालन (या गाय, म्हैस, वराह, शेळ्या, मेंढ्या अशा स्थानिक प्राण्यांचा समावेश), पक्षिपालन (यात कोंबडी, बदक, टर्की, ससा इ.) मत्स्यपालन (यात मासे, कोळंबी, कालव किंवा शिंपले, मोती उत्पादन इ.), पोल्ट्री, अळिंबी उत्पादन, मधमाशीपालन आणि काही प्रमाणात फळबाग यांची सांगड घालणे.
  • या प्रत्येक घटकातून तयार होणारे टाकाऊ सेंद्रिय घटक योग्य प्रक्रियेनंतर पुन्हा शेतीमध्ये वापरणे. उदा. बायोगॅस निर्मितीनंतर स्लरीचा वापर शेतांमध्ये करणे इ.
  • शेतीमध्येही मिश्रपीक, आंतरपीक पद्धती, पिकांमध्ये शास्त्रीय बदल करणे, सापळा पिके, सजीव कुंपणे यांचा समावेश केला जातो.
  • पाणी, पोषक घटक आणि अवकाशांचा कार्यक्षम वापर करणे. त्यातून पिकांवर येणाऱ्या जैविक आणि अजैविक ताणांचे विरेचन करणे.
  • विविध शेतीपूरक व्यवसायातून वर्षभर उत्पन्न मिळत राहील, याची व्यवस्था करणे.
  • ओडिशामध्ये भात शेती फुलोऱ्यात असताना आलेल्या फॅलीन वादळाने पिकांचे नुकसान झाले तरी कुटुंबाला दुग्ध व्यवसाय, ताग, मत्स्यपालन यातून काही प्रमाणात उत्पन्न मिळाल्याने वर्षभर तग धरणे शक्य झाले. त्या वेळी जे शेतकरी केवळ शेतीवर अवलंबून होते, त्यांच्या आर्थिक क्षमता शून्यावर आल्या होत्या. एकात्मिक शेती पद्धतीच्या प्रारूपानुसार २० ते ३० टक्क्यांनी उत्पन्न वाढत असल्याचे पुढे आले आहे. संपर्क-  वाणी एन., ०९४८०८३६८०५ (लेखिका एसबीआय- आर बी, हैदराबाद येथे संशोधन व्यवस्थापक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com