कृषी सल्ला कोकण विभाग

कृषी सल्ला कोकण विभाग
कृषी सल्ला कोकण विभाग

भुईमूग

 •    पेरणी अवस्था
 •    भुईमुगाची लागवड पारदर्शक प्लॅस्टिक आच्छादन (५ ते ६ मायक्रॉन) वापरून करणे फायदेशीर ठरते. या पद्धतीने लागवडीसाठी जमिनीची नांगरट करून जमीन समपातळीत आणल्यानंतर ५-७ सेंमी उंचीचे व ६० सेंमी रुंदीचे गादीवाफे तयार करावेत. 
 •    दोन गादीवाफ्यामधील अंतर ३० सेंमी ठेवावे. गादीवाफे तयार करताना ४ ते ६ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये वाफ्यावर मिसळावे. 
 •    एकरी ४४ किलो युरिया, २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ४० किलो म्युरेट ऑफ पोटॅश खताची संपूर्ण मात्रा पेरणीपूर्वी ओळीमध्ये ८ ते १० सें. मी. खोलीवर पडेल अशी द्यावी. 
 •    भुईमुगातील तणांच्या नियंत्रणासाठी ब्युटाक्लोर ५० मि.ली. प्रती १० लिटर पाणी या प्रमाणे ओलसर गादीवाफ्यावर पेरणीपूर्वी एकसारखी फवारणी करावी. 
 •    ठिबक सिंचनाच्या लॅटरल आच्छादन अंथरण्यापूर्वी टाकून घ्याव्यात. आच्छादनाच्या मध्यभागी २० सेंमी अंतरावर तीन ओळीमध्ये १० सेंमी अंतरावर ३ सेंमी व्यासाची छिद्रे पाडावीत. तणनाशक फवारणीनंतर प्लॅस्टिक आच्छादन गादीवाफ्यावर अंथरावे. कडांवर मातीचा थर द्यावा. 
 •    आच्छादनावर पाडलेल्या छिद्रामध्ये ३-४ सेंमी खोलीवर बियाण्याची पेरणी करावी. पेरणीसाठी १२५ ते १५० किलो प्रती हेक्टरी बियाणे वापरावे. 
 •    मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बियाण्यास पेरणीपूर्वी थायरम ३ ग्रॅम प्रती किलो या प्रमाणात चोळावे. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे.
 • काजू

 •    मोहोर
 •    मोहोर फुटण्याच्या वेळी काजू मोहोराचे ढेकण्या व फुलकिडीपासून संरक्षण करण्यासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी  
 •    प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १ मि.ली. 
 • आंबा

 •    पालवी ते बोंगे फुटणे अवस्था 
 •    जून झालेल्या आंबा पालवीला बोंगे फुटण्यास पोषक वातावरण तयार होत आहे. आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार दुसरी फवारणी तुडतुड्यांच्या व भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
 •    डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) १ मि.ली. अधिक गंधक (पाण्यात विरघळणारे ८० टक्के) २ ग्रॅम.
 • वाल

 •  रोप अवस्था 
 •  वाल पिकाची उगवण झाल्यानंतर १५ ते २० दिवसांनी रोपांची विरळणी करावी व  ६ ते ८ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.
 • कलिंगड

 •    रोप अवस्था
 •    कलिंगड पिकास ४ ते ५ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. 
 • वांगी 

 • रोप अवस्था 
 •  वांगी पिकाची रोपे लागवडीयोग्य झाली असल्यास पुनर्लागवड करावी. पाने लहान राहणे या रोगापासून संरक्षण करण्याकरिता पुनर्लागवड करतेवेळी रोपे डायमिथोएट १ मि. ली. प्रति लिटर पाणी या द्रावणात ५ मिनिटे बुडवून रोपांची लागवड करावी. लागवड सरी वरंब्यावर ६० x ६० सें.मी. अंतरावर करावी. लागवडीच्या वेळेस प्रती एकरी ८ टन शेणखत, ४३ किलो युरिया, १२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ३३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश खताची मात्रा द्यावी. लागवडीनंतर पाणी द्यावे.  
 • मिरची 

 •    रोप अवस्था 
 •    मिरची पिकाची रोपे लागवडीयोग्य झाली असल्यास पुनर्लागवड करावी. लागवड सरी वरंब्यावर ६० x ६० सें.मी. अंतरावर करावी. लागवडीच्या वेळेस प्रती एकरी ६ टन शेणखत, ६५ किलो युरिया, १८८ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ३३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश खताची मात्रा द्यावी. लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे.  
 •  ः ०२३५८- २८२३८७ (कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com