खरीप पिकांची लागवड करताना काय काळजी घ्यावी?

काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवली असली तरी अद्याप पेरणीची वेळ गेली नाही. या परिस्थीतीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाने विविध पिकाच्या पेरणीसह व्यवस्थापनाविषयी सल्ला दिला आहे.
Agri Advisary
Agri AdvisaryAgrowon

राज्यात अनेक ठिकाणी अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्या (Sowing) खोळंबल्या आहेत. परंतु काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. तिथे वाफसा झाल्यानंतर विविध पिकांच्या पेरणीची लगबग सुरु झाली आहे. काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवली असली तरी अद्याप पेरणीची वेळ गेली नाही. या परिस्थीतीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाने विविध पिकाच्या पेरणीसह व्यवस्थापनाविषयी सल्ला दिला आहे.

कापूस बियाण्याला थायरम/कॅप्टन/सुडोमोनास या बूरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी. यामूळे मर व करपा यासारख्या रोगाांचा प्रादूर्भाव कमी होतो.

नत्र स्थिरीकरणासाठी ॲझोटोबॅक्टर/ॲझोस्पिरीलिअम या जिवाणू संवर्धकाची १० मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. कापसाची लागवड १५ जूलै पर्यंत करता येते..

Agri Advisary
सोयाबीन, तूर पिकासाठी सुधारित पेरणी पद्धती काय आहे?

तूर पिकामध्ये पेरणीपूर्वी बियाण्यास २.५ ग्रॅम थायरम प्रति किलो चोळावे यामूळे जमिनीतून उद्भवणाऱ्या विविध रोगापासून पिकाचा बचाव होतो. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास १० ग्रॅम ट्रायकोडर्मा ची बिजप्रक्रिया करावी यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम प्रति १० किलो बियाण्यास गूळाच्या द्रावणातून चोळावे. स्फुरद विरघळवणारे जिवाणू संवर्धक (पीएसबी) २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास योग्य प्रकारे लावावे. तूर पिकाची लागवड १५ जूलै पर्यंत करता येते.

Agri Advisary
सोयाबीन पेरणीवेळी घ्यावयाची काळजी
Agri Advisary
बीडमध्ये बाजरी, उडीद, मूग, हरभरा, सोयाबीन आवकेत चढ-उतार

मूग,उडीद पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम चोळावे. ट्रायकोडर्मा १० ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात ट्रायकोडर्मा ची बिजप्रक्रिया करावी. जिवाणू संवर्धक रायझोबियम व पीएसबी २५० ग्रॅम प्रत्येकी प्रति १० किलो बियाण्यास चोळावे. मूग, उडीदाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते.

उपट्या जातीच्या भुईमूगाची पेरणी ३० बाय १० सें.मी. अंतरावर तर पसऱ्या जातीच्या भुईमूगाची पेरणी ४५ बाय १५ सें.मी. अंतरावर करता येते. उपटया जातीसाठी हेक्टरी १०० ते २०० किलो बियाणे लागते तर पसऱ्या जातीसाठी हेक्टरी ८० किलो बियाणे वापरावे. भुईमूगाची पेरणी ७ जूलै पर्यंत करता येते.

Agri Advisary
तंत्र भुईमूग लागवडीचे...

मका पिकास पेरणीपूर्वी सायॲन्ट्रानिलीप्रोल (१९.८ टक्के) + थायामिथॉक्झाम (१९.८ टक्के एफएस) ६ मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी या बिजप्रक्रियेमूळे पेरणीनंतर १५ ते २० दिवसांपर्यंत पिकाचे अमेरिकन लष्करी अळीपासून सांरक्षण होते. बियाण्यास थायरम २ ते २.५ ग्रॅम तसेच ॲझोटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे . मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता येते.

पाऊस झालेल्या ठिकाणी नविन केळी बागेची लागवड करावी.आांबा फळबागेत ५०० ग्रॅम नत्र, ५०० ग्रॅम स्फुरद आणि ५०० ग्रॅम पालाश प्रति झाड खतमात्रा दिली नसल्यास द्यावी. झाड दहा वर्षा पेक्षा मोठे असल्यास १००० ग्रॅम नत्र, ५०० ग्रॅम स्फुरद आणि ५०० ग्रॅम पालाश प्रति झाड खतमात्रा द्यावी. वाळलेल्या व रोगग्रस्त फाांद्यांची छाटणी करावी.द्राक्ष बागेतील फुटवे काढावेत. बागेत पानांची विरळणी करावी. बागेत आर्द्रता वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.सिताफळ बागेत ३०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद आणि ३०० ग्रॅम पालाश प्रति झाड खतमात्रा द्यावी.

भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com