डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा पीक सल्ला

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दिलेल्या सल्ल्यानूसार भात, नागली, आंबा, चिकू आणि नारळ पिकाचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे करावे.
Crop Advisary
Crop AdvisaryAgrowon

प्रादेशिक हवामान विभाग मुंबईद्वारे देण्यात आलेल्या हवामान अंदाजा नुसार दिनांक १० जुलै पर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आकाश ढगाळ राहून कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दिलेल्या सल्ल्यानूसार भात, (Rice) नागली, आंबा (Mango), चिकू आणि नारळ (Coconut) पिकाचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे करावे.

-भात, नागली रोपवाटिका, भाजीपाला पिके, नविन लागवड केलेल्या फळबागेतून अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.
-भात रोपवाटिकेत खत व फवारणीची कामे न करता पाऊस ओसरल्यानंतर करण्याचे नियोजन करावे.
-आंबा, चिकू व काजू इत्यादी फळांच्या कलमांना काठीचा आधार द्यावा आणि लागवड क्षेत्रातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.
-नारळ बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच नवीन लागवड केलेल्या नारळ रोपाच्या बुंध्याजवळ पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी जेणेकरून बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
-वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड पाऊस उघडल्यानंतर करावी.
-जनावरांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. फक्त हिरवा चारा न देता थोडा सुकवून किंवा सुक्या चाऱ्यासोबत मिसळून द्यावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com