मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी काय आहे पीक सल्ला?

जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी संत्रा/मोसंबी, डाळिंब, चिकू बागेत झाडाच्या खोडाजवळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
Snail Attack
Snail AttackAgrowon

गेल्या आठवड्यापासून राज्यात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. काही ठिकाणी सरासरीएवढा पाऊस (Monsoon) झाला आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी (Heavy Rainfall) झाली आहे. विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक १४ जुलै ते २० जूलै दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी, किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरी एवढा राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रह छायाचित्रानुसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झाला असून जमिनीतील ओलाव्याचे (Moisture) प्रमाण वाढले आहे.

Snail Attack
Weather Updates: घाटमाथ्यावर दमदार पाऊस,धरणसाठ्यात होणार वाढ

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी सल्ला (Crop Advisory) दिला आहे. मराठवाड्यात औंढा नागनाथ, वसमत (जि. हिंगोली), जाफराबाद (जि. जालना), बिलोली, नायगाव (जि. नांदेड), लोहारा (जि. उस्मानाबाद) या तालुक्यांत पेरणी योग्य पाऊस (७५-१०० मिमी) झाला आहे. या ठिकाणी जमिनीतील ओलावा पाहून वाफसा येताच बिजप्रक्रिया करुन खरीप पिकांची पेरणी करावी. ८ जूलै नंतर भुईमूग, मुग, उडीद ही पिके घेऊ नयेत.

Snail Attack
मूग, उडदाची लागवड का घटतेय?

शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव
ज्या ठिकाणी जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाला होता त्या ठिकाणचे सोयाबीन रोप अवस्थेत आहे. सोयाबीनसह कापूस, भाजीपाला व विविध फळबागांमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी सोयाबीन व कापूस यांसारख्या पिकांमध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रतिझाड १० ग्रॅम पसरून टाकावे.

पीक व्‍यवस्‍थापन
संकरित ज्वारी आणि सोयाबीन पिकाची पेरणी १५ जुलैपर्यंत करता येते. पेरणीयोग्य पाऊस (७५ ते १०० मिमी) झाल्यानंतर वाफसा येताच बिजप्रक्रिया करून पेरणी करावी. बाजरी पिकाची पेरणी २० जुलैपर्यंत करता येते. जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी ऊस आणि हळद पिकांत साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना ४५ दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पुनर्लागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुलपिकांची पुनर्लागवड करावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

Snail Attack
कापूस पिकासाठी पाणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन

फळबागेचे व्‍यवस्‍थापन
जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी संत्रा/मोसंबी, डाळिंब, चिकू बागेत झाडाच्या खोडाजवळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
रेशीम शेतीसाठी सल्ला
ढगाळ वातावरणात रेशीम कीटक संगोपनाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. किटकाच्या कात अवस्थेत बाह्य रेशीम कीटक संगोपनगृहात २५ अंश सेल्सिअस तापमान व ६५ टक्के सापेक्ष आर्द्रता असणे आवश्यक असते. कातेवर बसताना ५ ग्रॅम प्रति चौ. फुट याप्रमाणे पांढऱ्या कळीच्या चुन्याची अळ्यांवर धुरळणी करावी. २४ तास कात अवस्थेत असलेल्या किटकांना खाद्य देऊ नये. किटकाची कात अवस्था ओळखता येणे महत्वाचे आहे. किटक कातेवरून उठताना खाद्य देण्याअगोदर अर्धातास निर्जंतुक पावडरची अळ्यांवर सच्छिद्र पातळ सुती कपडयाने धुरळणी करावी. १०० अंडीपुंजास १५ किलो चुना व ४.५ किलो निर्जंतूक पावडर लागते.

Snail Attack
Silk Farming : रेशीम शेतीत बेण्याऐवजी तुती रोपे लागवडीवर भर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com