हवामान अंदाजानूसार पिक व्यवस्थापन कसे करावे?

पिकाचे कीड व रोगा संदर्भात नियमित सर्वेक्षण करून जर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास विविध योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
Rice Cultivation
Rice CultivationAgrowon

विस्तारित हवामान अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये दिनांक १७ ते २३ जुलै दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. कमाल व किमान तापमान सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे. हवामान अंदाजानुसार विविध पिकांत पुढीलप्रमाणे व्यवस्थापन करावे, असा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी दिला आहे.

पिकाचे कीड व रोगा संदर्भात नियमित सर्वेक्षण करून जर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास विविध योग्य त्या उपाययोजना कराव्यात. अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने फवारणी पुढे ढकलावी किंवा पावसाचा अंदाज बघून पिकावर कीटकनाशकाची किंवा बुरशीनाशकाची फवारणी करावी. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने वरखते देणे पुढे ढकलावे.

हवामान अंदाज यावर आधारित कृषी सल्ला व हवामानाच्या पूर्वानुमानाकरिता मेघदूत मोबाईल ॲपचा वापर करावा.

मेघगर्जना व विजेचा पूर्वानुमानाकरिता दामिनी मोबाईल ॲपचा वापर करावा.

पडणाऱ्या पावसाचे पाणी शेतात साठवण्यासाठी, मुरविण्यासाठी पिकाच्या ओळीनंतर चर काढावेत.

जिवाणू संवर्धके वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळी असतात. जीवाणू संवर्धक खते वापरल्याने रासायनिक खतांची उणीव संपूर्णपणे भरून काढता येत नाही. म्हणून ही खते रासायनिक खतांना पूरक खते म्हणून वापरावीत.

Rice Cultivation
Fertilizer Price Hike: खते महागल्यामुळे भात लागवड घटली?

भात रोपांची पुनर्लागवड

भात रोपवाटिकेतील रोपांचे वय १५ दिवस झाल्यानंतर ५०० ग्रॅम नत्र किंवा एक किलो अमोनियम सल्फेट प्रतिगुंठा द्यावे .

पिकाच्या लागवडीसाठी भात खाजरात चिखलणी करून २१ दिवस पूर्ण झालेल्या रोपांची लागवड करावी.

भात रोपांची खाचरातील लागवड पुरेसा पाऊस पडल्यानंतरच करावी. जोरदार पावसाची शक्यता असल्याने लागवड पुढे ढकलली तरी चालेल.

पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

खोडकिडीच्या नियंत्रणासाठी पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे क्लोरपायरीफॉस (२० टक्के इसी) ०.१ टक्के द्रावणात १२ तास बुडवून मगच लागवड करावी.

आडसाली ऊस लागवड

अडसाली ऊस लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करून रानबांधणी, आखणी पूर्ण करावी. लागवड करताना को ८६०३२ व को ०२६५ या शिफारशीत जातींचा वापर करावा. लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी. लागवडीपूर्वी बेण्याला जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

Rice Cultivation
Sugarcane: पावसामुळे आडसाली ऊस लागवड खोळंबली

केळी बाग व्यवस्थापन

नवीन केळी फळबागेची लागवड पुरेसा पाऊस झाल्यावरच करावी. पूर्वी लागवड केलेल्या बागेत अंतर मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावीत. झाडे पडू नयेत म्हणून वजनाने मोठ्या असलेल्या घडास गरजेप्रमाणे बांबूच्या किंवा पॉलीप्रोपेलीनच्या पट्ट्यांच्या सहाय्याने झाडांना व घडांना आधार किंवा टेकू द्यावा.

केळीच्या बुंध्याजवळ वाढणारी पिले धारदार शस्त्राने नियमित कापावीत. केळीवरील जुनी वाळलेली व रोगट पाने कापून बाग स्वच्छ ठेवावी.

Rice Cultivation
केळी दरात सुधारणा सुरूच

पशुधनासाठी सल्ला

जनावरांच्या गोठ्याभोवती पाणी साठणार नाही तसेच गोठ्यात ओलसरपणा राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जंतांच्या व विविध आजाराच्या नियंत्रणासाठी पशुवैद्यकाच्या सहाय्याने जंतनाशक व लसी जनावरांना पाजावे किंवा टोचून घ्यावे. लाळ खुरकूत फऱ्या व घटसर्प या रोगांच्या एकत्रित रोगप्रतिबंधक लसी टोचून घ्याव्यात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com