Crop Management : काढणीयोग्य पीक व्यवस्थापनातील या बाबी लक्षात घ्या

सध्या राज्यात सर्वच भागात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे अतिव़ृष्टीतून बचावलेल्या आणि वेळेवर लागवड केलेल्या सोयाबीन, कापूस पिकांच्या काढणीला वेग आला आहे.
Crop Management
Crop ManagementAgrowon

सध्या राज्यात सर्वच भागात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे अतिव़ृष्टीतून बचावलेल्या आणि वेळेवर लागवड केलेल्या सोयाबीन (Spoybean), कापूस (Cotton) पिकांच्या काढणीला वेग आला आहे. याशिवाय तूर व्यवस्थापन आणि रब्बी मका (Maize), ज्वारी लागवडीविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया. 

Crop Management
Cotton Rate: कापूस बाजारावरील दबाव कधी दूर होईल? | Agrowon | ॲग्रोवन

वेळेवर लागवड केलेल्या व वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी. जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही. 

कापूस पिकात लाल्या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी २० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात. 

Crop Management
Maize Procurement : मका, ज्वारीची १ नोव्हेंबरपासून खरेदी

काढणी केलेले सोयाबीन उन्हात वाळवूनच मळणी करावी. पुढील हंगामात बियाण्यासाठी सोयाबीनचा वापर करायचा असेल तर आर्द्रतेचे प्रमाण १४ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ४०० ते ५०० आरपीएम तर आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ३०० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर करावी. जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशींपासून बियाण्याचे संरक्षण होईल. 

तूर पिकात फायटोप्थोरा ब्लाईट रोगाचा प्रादूर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी वापसा येताच लवकरात लवकर ट्रायकोडर्मा १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून खोडाभोवती आळवणी व खोडावर फवारणी करावी.  

Crop Management
Soybean Harvest : पावसाच्या उघडीपनंतर सोयाबीन काढणीला वेग !

तूर पिकावरील पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी ५ % निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस (२५ %) १६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या खरीप भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. 

रब्बी मका पिकाची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत करता येते. पेरणी ६० X ३० सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी १५ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. 

बागायती रब्बी ज्वारी पिकाची पेरणी लवकरात लवकर करावी. पेरणी ४५ X १५ सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. परेणीपूर्वी काणी रोग प्रतिबंधासाठी ३०० मेष गंधक ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. पोंगेमर व खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झाम (७० %) ४ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड (४८ %) १४ मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com