ShreeRam Pawar : साखर कारखान्यांनी इंधननिर्मितीकडे वळावे : श्रीराम पवार

राजारामबापू साखर कारखान्यात बॉयलर अग्निप्रदीपन
Shreeram Pawar
Shreeram PawarAgrowon

सांगली ः केवळ साखर उत्पादनापुरते (Sugar Production) मर्यादित न राहता सहकारी साखर कारखान्यांनी इंधननिर्मितीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. हे करताना निसर्गाची हानी टाळण्यासाठीच्या उपाययोजनाही प्राधान्याने केल्या पाहिजेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रदूषण टाळले पाहिजे, अशी आग्रही भूमिका ‘सकाळ माध्यम समूहा’ (Sakal Media) चे संपादक-संचालक श्रीराम पवार (ShreeRam Pawar)यांनी मांडली.

Shreeram Pawar
Sugar Mill : अगस्ती साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचडांची सत्ता गेली

साखराळे येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. श्री. पवार आणि ‘स्मार्ट सोबती’च्या संपादक सौ. सुरेखा पवार या दाम्पत्याच्या हस्ते सोमवारी (ता. २६) बॉयलर अग्निप्रदीपन झाले. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. बॉयलर अटेंडंट सचिन पोळ यांचा सत्कार करण्यात आला.

श्रीराम पवार म्हणाले, की येत्या काळात ड्रोनचे महत्त्व वाढेल. त्यातून युवकांना कामही देता येईल.

Shreeram Pawar
Sugar Mill : घोडगंगा कारखान्याला यंदा २१ कोटींचा तोटा

आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्ससारख्या यंत्रणांचा वापर करावा लागेल. राजारामबापू साखर कारखाना इथेनॉलनिर्मिती करतो, याचे कौतुक आहे, पण हे उत्पादन वाढवावे लागेल. भविष्यात जे साखर कारखाने इथेनॉलसह उपपदार्थनिर्मितीवर भर देतील, जास्तीत जास्त व्यावसायिकता स्वीकारतील आणि येणारे बदल स्वीकारून वाटचाल करतील, तेच टिकतील. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राकडे पाहण्याची तुच्छतेची भावना देशभर आहे. त्यांना राजारामबापू कारखाना हे सडेतोड उत्तर ठरेल. जगण्याच्या सगळ्या क्षेत्राला या संस्थेने स्पर्श केला आहे.

Shreeram Pawar
Sugar Export : साखर निर्यात धोरणास विलंब नको

सहकार आणि साखर कारखानदारी नसती तर महाराष्ट्राची अवस्था वाईट असती. राजारामबापूंनी संस्थांच्या माध्यमातून अभावग्रस्तांना आधार दिला. बापूंनी आपल्या उभ्या आयुष्यात पांढऱ्या कपड्यावर डाग पडू दिला नाही. त्यांचे शेतकरी वर्गावर मोठे उपकार आहेत. अनेकांचे संसार त्यांनी उभे केले. त्‍यांचे राजकारण अंतर्बाह्य स्वच्छ राहिले.

कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील म्हणाले, की भारताने गेल्या वर्षी ४०० लाख टन साखर उत्पादन घेत ब्राझीलला मागे टाकले.

Shreeram Pawar
Sugar Rate : देशांतर्गत बाजारात ऑक्टोबर मध्यापर्यंत समाधानकारक दराने साखरविक्री

महाराष्ट्राचा वाटा १३६ लाख टन आहे. तो चीन, रशिया, थायलंड या देशांपेक्षा जास्त आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र जास्त असल्याने विक्रमी साखर उत्पादन होईल. केंद्र सरकारने साखरनिर्यातीचे निकोप धोरण ठरवावे. यावर्षी कोणत्याही परिस्थितीत ७० ते ८० लाख टन साखर निर्यात करून सारखेची किमान किंमत ३१०० वरून ३७००-३८०० करावी लागेल.

विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.

उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी आभार मानले. कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, प्रा. शामराव पाटील, नेताजीराव पाटील, आनंदराव पाटील, दिलीपराव देसाई, शंकरराव भोसले, सुहास पाटील, प्रशांत पाटील, उमेश सुतार आदी उपस्थित होते.

शेतीमालाची दरवाढ का नको?

श्री. पवार म्हणाले, की साखरेला किमान किंमत देण्याचे धोरण सरकारने राबवले पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी दबाव वाढवला पाहिजे.

अलीकडे सर्वच किमती वाढत असताना सर्वच शेतीमालाच्या दर वाढीलाच विरोध का होतो? मोबाइलपासून सर्व वस्तूंच्या किमती उत्पादक ठरवितो, पण कृषिमालाचे दर ठरविण्याचे अधिकार आपणाला नाहीत. या स्थितीत कारखान्यांना कार्बनविरहित इकॉनॉमीकडे जावे लागेल. त्यासाठी उपपदार्थनिर्मितीवर भर हवा. भविष्यात मोठ्या वाहनांचा अपवाद वगळता बहुतांश वाहने वीज किंवा इथेनॉलवर चालतील. नव्या तंत्रज्ञानात प्रदूषणाला वाव नाही. व्यावसायिक अर्थाने त्यावर संशोधन गरजेचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com