सोयाबीन पिवळे पडत असेल तर काय कराल ?

लोह किंवा फेरस या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सोयाबीन पिकामध्ये `क्लोरॉसिस` ची लक्षणे दिसून येतात.
सोयाबीन पिवळे पडत असेल तर काय कराल ?

राज्यात काही ठिकाणी जूनमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला. तिथे शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरण्या (Soybean Sowing) उरकून घेतल्या. सद्यस्थितीत हे सोयाबीन रोप अवस्‍थेत आहे. मराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडत आहे. लोह किंवा फेरस (Ferrous) या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सोयाबीन पिकामध्ये `क्लोरॉसिस` (Chlorosis) ची लक्षणे दिसून येत आहेत. क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती (Physical Disorder) आहे. तिच्या नियंत्रणासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने पुढील उपाययोजना सुचविलेल्या आहेत.

सोयाबीन पिवळे पडत असेल तर काय कराल ?
Soybean : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी सुधारित पद्धत

क्लोरोसिसची लक्षणे
लोह किंवा फेरस या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो. शिरा फक्त हिरव्या दिसतात.
सोयाबीनची पहिली त्रिदल पाने हिरवी राहतात. कारण लोह हे अचल अन्नद्रव्य असते. ते वाहू शकत नाही. लोह रोपट्यात स्थिर होऊन साठवले जाते. म्हणूनच, नवीन पानांमध्ये लक्षणे दिसून येतात. पाने पिवळी पडल्यामुळे हरितद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते.

सोयाबीन पिवळे पडत असेल तर काय कराल ?
Edible Oil : पामतेल पडले, सोयाबीनचे काय होईल?

पाने पिवळी पडण्‍याची कारणे
पाण्याचा निचरा कमी प्रमाणात होणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनीत प्रामुख्याने लोहाची कमतरता दिसते. वनस्पतींमध्ये हिरवे रंगद्रव्य क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोह आवश्यक असते. बहुतेक जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह असते. तथापि, बर्‍याचदा जमिनीचा सामू (पीएच) ७.५ पेक्षा जास्त असतो. त्या जमिनीतील लोह फेरस या उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो. तो पिकांना शोषून घेता येता नाही. त्यामुळे पिकामध्ये लोहाची कमतरता दिसून येते.

कसे कराल व्यवस्थापन ?
- वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात साचलेले पावसाचे अतिरिक्त पाणी काढून टाकावे.
- फेरस सल्फेट ०.५ टक्के म्हणजे ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पानांवर फवारणी करावी.

(अधिक माहितीसाठी संपर्कः कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ०२४५२ २२९०००.)

सोयाबीन पिवळे पडत असेल तर काय कराल ?
तूर, कापूस एकत्र का घेऊ नये ?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com