
बॅंकेमध्ये खाते उघडण्यापासूनच आपल्याला ‘केवायसी’ पूर्ण करण्याचा लकडा अधिकाऱ्याकडून लावला जातो. केवायसी म्हणजे ‘नो यूवर कस्टमर’. ग्राहकांना जाणून, त्याची सत्यता पटविण्यामुळे भविष्यातील अनेक गैरप्रकार व नुकसान टाळणे शक्य होते. खातेदाराची ओळख पटवणे (KYC) ही एक कायदेशीर प्रक्रिया व आवश्यकता आहे. बँकेमध्ये उघडण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या खात्यासाठी आवश्यक ओळख कागदपत्रांची यादी सोबत दिली आहे. बॅंक या कागदपत्राच्या व्यक्तीची ओळख, रहिवासी पुरावा व अन्य काही बाबी जाणून घेते. त्यामुळे भविष्यातील फसवणुकीचे प्रकार कमी करण्यास मदत होते. कोणीही कोणाच्या नावे खाते उघडणार नाही, याची शाश्वतता मिळते. प्रसंग १ दिनेशच्या मोबाईलवर एक मेसेज आला. ‘‘आठ दिवसांत तुम्ही KYC कागदपत्रे बँकेत सादर करा, अन्यथा आपल्या बचत खात्याचे व्यवहार थांबविण्यात येतील.’’ वास्तविक गेल्या पाच वर्षांपासून दिनेश यांचे बँकेत खाते व्यवस्थित चालू होते. मग अचानक हे काय नवीन, असा प्रश्न त्याला पडला. मेसेजचा अर्थ नक्की समजला नसल्याने त्याने त्वरित बॅंकेत धाव घेत ‘ KYC’ म्हणजे काय, हे जाणून घेतले. त्यानुसार कागदपत्रांची पूर्तता केली. प्रसंग २ अंजलीला बँकेत खाते काढावयाचे होते. ती बँकेत गेली. खाते उघडण्याचा फॉर्म घेतला. बँक अधिकाऱ्यांनी या अर्जासोबत KYC कागदपत्रे जोडायला सांगितली. तिच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह लक्षात आल्याने त्या अधिकाऱ्याने अधिक खुलासा केला. ते म्हणाले, ‘‘अर्जाच्या मागे अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी दिली आहे, त्याप्रमाणे कागदपत्रे सादर करा. KYC म्हणजे तुमची ओळख करून देणारी कागदपत्रे, स्वतःचे छायाचित्र असलेले ओळख पत्र आणि तुमचा रहिवासी दाखला होय. अंजलीने खाते उघडण्याचा अर्ज भरला. त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून बँकेस सादर केली. मगच बँकेत अंजलीचे बचत खाते उघडले गेले. ‘केवायसी’ मार्गदर्शक तत्त्वाचे उद्दिष्ट
‘केवायसी’साठी आवश्यक कागदपत्रे बचत खाते (Savings Bank Account)
मालकी हक्क फर्म (Proprietorship Firm) साठी चालू खाते (Current Account)
भागीदारी फर्म (Partnership Firm) ः
ट्रस्ट (TRUST)
अनोंदणीकृत संस्था (वैयक्तिक एकत्र येऊन स्थापन केलेला गट)
नवीन कंपनी
सोसायटी, असोसिएशन व क्लब
खातेदाराच्या दृष्टिकोनातून ‘केवायसी’चे फायदे बँकेत खाते उघडताना खातेदारास ‘केवायसी’ कागदपत्रे सादर करणे कायदेशीरदृष्ट्या अत्यावश्यक आहे. त्याशिवाय खाते उघडता येत नाही. मात्र हे कायदेशीर बंधन खातेदारांसाठी तितकेच फायदेशीर आहे. खातेदाराची ओळख बॅंकेकडे कायमस्वरूपी नोंदवली जाते. त्याआधारे पुढील काळात कोणतीही शंका आल्यास ग्राहकाची ओळख पटवता येते. परिणामी, संभाव्य गैरप्रकारांना आळा बसू शकतो. कोणाच्या नावे खाते, खोटी खाते तयार करून त्यातील बेनामी व्यवहार होण्याची शक्यता यामुळे कमी होते. कागदपत्राअभावी अन्य कोणीही आपल्या नावे खाते उघडू शकत नाही. परिणामी, खात्याची सुरक्षितता वाढते. व्यवसायाच्या नावे खाते उघडताना त्या व्यवसायांचे नाव, नोंदणी प्रमाणपत्रे व संचालकांच्या केवायसी कागदपत्रे घेतली जातात. यातून ते खाते त्या व्यवसायासाठीच खाते उघडले व वापरले जाणार असल्याची खात्री बँकेस दिलेली असते. त्यामुळे कोणत्याही गैरव्यवहाराची शक्यता कमी होते. - अनिल महादार, ८८०६००२०२२ (लेखक बॅंक ऑफ इंडियाचे निवृत्त सहायक महाव्यवस्थापक आहेत.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.