BJP : भाजप ‘चंद्रपूर लोकसभा’ जिंकणारच!

प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा; केंद्रीय मंत्र्यांची प्रभारी म्हणून निवड
 BJP will win 'Chandrapur Lok Sabha'!
BJP will win 'Chandrapur Lok Sabha'!Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) चंद्रपूर मतदार संघ हातून गेल्यानंतर आता भाजपने २०२४ च्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. या मतदार संघाचे प्रभारी म्हणून केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ते येत्या २२ ते २४ सप्टेंबर या दरम्यान या लोकसभा मतदार संघाचा दौरा करतील. समाजातील विविध घटकांशी संवाद साधतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

 BJP will win 'Chandrapur Lok Sabha'!
Cotton Rate : कापूस उत्पादनवाढीचा अंदाज किती खरा?

बावनकुळे यांनी चंद्रपूर दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. अपघाताने या मतदार संघात आमचा पराभव झाला. आता ही चूक होणार नाही. आमचा यापुढे नक्कीच विजय होईल, असा दावा त्यांनी केला. पहिल्या टप्प्यात भाजपच्या ताब्यात नसलेल्या १६ मतदार संघात ही जनसंपर्क मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी केंद्रातील वेगवेगळ्या मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आठ वर्षांच्या मोदीच्या कार्यकाळात या मतदारसंघाचा विकास झाला आहे. पुढील दोन वर्षांत विकासाच्या दृष्टिकोनातून आणखी काय करता येईल, याचा आढावा या दौऱ्याच्या निमित्ताने करता येईल. या संपर्क दौऱ्यात जवळपास दीडशे पदाधिकारी सहभागी होतील.
पुढील अठरा महिन्यांत अशा प्रकारचे सहा दौरे होतील. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून विकासाची कामे केली जाईल. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा आम्ही सोडलेला नाही. देशात जेव्हा आणखी राज्याची निर्मिती होईल. तेव्हा स्वतंत्र विदर्भसुद्धा होईल, असे बाळनकुळे यांनी सांगितले.
भाजपच्या ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांची नाराजी, पालकमंत्रिपदाचा अद्याप न झालेली घोषणा आदी मुद्यांवर त्यांनी बोलणे टाळले. मी केवळ संघटनात्मक बाबी बोलू शकतो. मंत्रिमंडळाचा विस्तार, त्यात कोणाला समाविष्ट करायचे, याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री शिंदे यांना आहे. त्यामुळे यावर मी बोलणे योग्य होणार नाही, असे बाळनकुळे यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला खासदार अशोक नेते, माजी खासदार हंसराज अहीर, आमदार बंटी भांगडिया, माजी आमदार संजय धोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित होते.

 BJP will win 'Chandrapur Lok Sabha'!
सोपा म्हणतेय, सोयाबीन पीक जोमात

राज मित्र, उद्धववर गप्प
राज्यात शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर आता राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे आणि भाजप यांची जवळीक वाढली आहे. राज्यातील भाजपचे अनेक नेते ठाकरे यांच्या भेटी घेत आहे. मात्र या निव्वळ मैत्रीपूर्ण भेटी आहेत. याचा राजकारणाशी काही संबंध नाही. युतीची चर्चा दूरपर्यंत नाही. मात्र भविष्यात काय होईल ते सांगता येणार नाही, असे सूचक वक्तव्य बाळनकुळे यांनी केले. राज ठाकरेंना मित्र म्हणून संबोधताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना राजकीय वैरी ठरविले. त्यांनी आमच्याशी दगाफटका केला. त्यांच्याशी आमचे राजकीय वैर आहे, असे त्यांनी सांगितले. शेवटपर्यंत त्यांनी उद्धव ठाकरे यांना मित्र संबोधण्याचे टाळले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com