तरुण शेतकऱ्यांना मिळाले शेतीमाल निर्यातीचे धडे

निर्यात संधी शोधणाऱ्या तरुणांनी बाजारपेठेची मागणी व पुरवठा अभ्यासण्याची गरज आहे.
youth Farmer
youth FarmerAgrowon

नाशिक : प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) व कृषी तंत्रज्ञान (Agricultur Technology)व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिकतर्फे ग्रामीण युवकांना (rural youth0कौशल्य आधारित प्रशिक्षण २०२१-२२ अंतर्गत ‘कृषी मालाची आयात निर्यात आणि कृषी मालाची साठवणूक व निर्यातीसाठी प्रतवारी प्रशिक्षण कार्यक्रम’ कार्यक्रम नुकताच झाला. या सहा दिवसीय कार्यक्रमात तरुण शेतकऱ्यांनी शेतमाल निर्यातीसंबंधी विविध विषयांवर धडे गिरविले.

२१ ते २६ मार्च दरम्यान झालेल्या सहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात आयात निर्यात(Import- Export) विषयाची तोंड ओळख, आंतरराष्ट्रीय व्यापार, निर्यात संधी, वित्तीय पाठबळ आदी मुद्द्यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, ‘फोरम ऑफ इंटिग्रेटेड ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट’चे(Forum of Integrated Agriculture Development) अध्यक्ष शरद नानापुरे, ‘उद्योगवर्धिनीचे’चे प्रशिक्षक एम.डी.कुलकर्णी, आदित्य एकबोटे, धनंजय वार्डेकर, ‘अॅगमार्क’चे गुलजार सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी विश्वास बर्वे, आदी उपस्थित होते.

youth Farmer
भारताकडून ३० लाख कोटी माल निर्यातीचे लक्ष्य साध्य : मोदी

निर्यातीसाठी तांत्रिक ज्ञान आवश्यक

निर्यात(Export) संधी शोधणाऱ्या तरुणांनी बाजारपेठेची मागणी व पुरवठा अभ्यासण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना(Farmer)शेतमाल(Commodities) पिकवता येतो. मात्र, उत्पादित मालाचे मूल्यमापन करता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात कामकाज करताना मागणी अभ्यासून पुरवठा करावा. जागतिक बाजारपेठेत(World Market) ग्राहक शोधून कामकाज करावे लागेल. त्यासाठी संपर्क, शोध महत्वाचा आहे,’’ असा सल्ला कृषी पर्यवेक्षक संजय बोरसे यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com