महाराष्ट्र सरकारचा मोंदींना पाठींबा?; राजू शेट्टींचं राहुल गांधीना पत्र

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने भूमी अधिग्रहण कायद्यात बदल केला आहे. राज्यातील भूमीअधिग्रहण कायद्यातील बदलाविरोधात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Rahul Gandhi Raju Shetti
Rahul Gandhi Raju Shetti

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aaghadi Government) भूमी अधिग्रहण (Land Acquisition Act) कायद्यात बदल केला आहे. राज्यातील भूमीअधिग्रहण कायद्यातील बदलाविरोधात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेट्टी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधीना (Congress Leader Rahul Gandhi) पत्र लिहून याबाबत तक्रार केली आहे. ''काँग्रेसचं धोरण बदललं आहे की, महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आता तुमचं ऐकत नाही" अशा खोचक शब्दात शेट्टी यांनी ट्विट केले आहे. 

शेट्टी यांनी आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधींना लिहिलेल्या पत्राचा फोटो ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी राहुल गांधींना उद्देशून म्हटले आहे की,  “प्रिय साथी राहुल गांधी २०१३ मध्ये काँग्रेसने केलेल्या भूमी अधिग्रहण कायद्यात मोदी सरकार २०१५ ला दुरुस्ती करून बदल करणार होतं. तेव्हा तुमच्या पक्षाने शेतकऱ्यांना साथ देत त्याचा विरोध केला होता. पण महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने या कायद्यात दुरुस्ती करत शेतकरीविरोधी भूमी अधिग्रहणाचा कायदा केला. काँग्रेसचं धोरण बदललं आहे की, महाराष्ट्र काँग्रेसचे नेते तुमचं ऐकत नाहीत?” 

प्रिय साथी @RahulGandhi २०१३ मे काँग्रेस ने बनाये हुये भुमिअधिग्रहण कानून मे २०१५ को मोदी सरकार संशोधन करके बदलाव लानेवाले थे ! तब आपकी सरकार देशके किसानोंके साथ रहकर इस संशोधन को विरोध किया, लेकीन महाराष्ट्र के महाविकास गटबंधन सरकारने इस कानून मे संशोधन करके किसान विरोधी pic.twitter.com/7gxDoLU3MA

— Raju Shetti (@rajushetti)

राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात शेट्टी यांनी म्हटले आहे की, २०१३ मध्ये जंतर मंतरवर भूमी अधीग्रहण तसेच इतर मुद्द्यांवर आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर सोनिया गांधींनी जयराम रमेश यांना यामध्ये लक्ष घालण्यास सांगून तोडगा काढण्यास सांगितले होते. युपीएने इतर पक्षांसोबत चर्चा करत देशासाठी जमीन अधिग्रहण धोरण आणले. हा एक ऐतिहासिक निर्णय होता. विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी तसेच यासाठी जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा चांगला निर्णय होता,” असे राजू शेट्टीं यांनी या पत्रात म्हटले आहे. 

मात्र, २०१५ मध्ये मोदी सरकारने अदानी आणि अंबानी यांच्या दबावामुळे या कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. यातील बदलांमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होणार होते. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आणि इतर शेतकरी संघटनांसोबत मिळून मोदी सरकारकडून केल्या जाणाऱ्या बदलांना विरोध केल्याचेी आठवण शेट्टींनी राहुल गांधीना करून दिली आहे. 

व्हिडीओ पाहा - 

“तुम्ही हा मुद्दा लोकसभेत मांडत आमच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. पण मोदींनी खेळी करत हा चेंडू कोर्टात ढकलला. दुर्दैवाने आता महाराष्ट्र काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या साथीने शेतकऱ्यांना रस्त्यावर आणत आहे. महाराष्ट्र सरकारने एखाद्या शेतकऱ्याची जमीन घेतल्यास त्याला मिळणारी किंमत अर्ध्यावर आणली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार मोदींना पाठिंबा देत असल्याचे दिसत असून बाळासाहेब थोरात यांनाही याची कल्पना आहे. तुम्ही तात्काळ महाराष्ट्राच्या नेतृत्वाला हा निर्णय मागे घेण्यास सांगावे,” अशी विनंती शेट्टी यांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com