महाराष्ट्रातले शेतकरी का जाताहेत तेलंगणात ?

राज्यातील शेतीकामासाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विद्युतपुरवठ्याचा प्रश्न आता शेजारच्या राज्यांतही चर्चिल्या जातोय. तेलंगणाचे अर्थमंत्री हरीश राव यांनी याचा स्पष्ट उल्लेख केलाय. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची २४ तास अखंड वीजपुरवठ्याची मागणी पूर्ण करता येत नसल्यानं ते तेलंगणात येऊन शेतजमिनी खरेदी करत असल्याचं हरीश रावांचं म्हणणं आहे.
Maharashtra Farmers are Purchasing Land in Telangana
Maharashtra Farmers are Purchasing Land in Telangana

महाराष्ट्र ( Maharashtra) सरकारकडून शेतीकामासाठी होणारा वीजपुरवठा हा तसा बहुचर्चित विषय आहे. मात्र आता तो जरा वेगळ्या प्रकारे प्रकाशझोतात आला आहे. तो कसा हे पाहण्यापूर्वी आपण राज्यातील शेती आणि राज्य सरकारकडून होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबतच्या तक्रारींवर नजर टाकुयात. 

शेती पंपासाठी पुरेसा वीजपुरवठा करण्यात येत नाही, शेतकऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा वीजबिलांची आकारणी करण्यात येते, या वीजबिलांची वसुली करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांची विद्युत जोडणी खंडित करण्याची मोहीम राबवते, शेतकऱ्यांकडून त्याविरोधात करण्यात आलेली निदर्शने , त्याचे विधी मंडळ अधिवेशनात (Assembly Seccions) उमटलेले पडसाद इत्यादी घडामोडी आपल्याला ठाऊक आहेत. 

मात्र शेतीकामासाठी वीज पुरवण्यात राज्य सरकारला येणाऱ्या अपयशाची कथा शेजारच्या राज्यांतही पोहचल्या असून त्यामुळे हा विषय प्रकाशझोतात येतोय.   

शेतकऱ्यांना वीज पुरवण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्यामुळं महाराष्ट्रातले शेतकरी शेजारच्या तेलंगणामध्ये (Telangana) शेतजमीन खरेदी करत आहेत ? हे आपल्याला माहिती आहे का ?  कारण असा खुल्लमखुल्ला दावा तेलंगणाचे अर्थमंत्री (Finance Minister) टी.हरीश राव (T. Harish Rao) यांनी केलाय. 

व्हिडीओ पहा- 

सिद्दीपेट (Siddipet constituency) इथल्या विकास प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या हरीश रावांनी (T. Harish Rao) , महाराष्ट्रातले शेतकरी स्थानिक वीजपुरवठ्याच्या समस्येला वैतागून तेलंगणात जमिनी खरेदी करताहेत, कारण तेलंगणातील शेतकऱ्यांना २४ तास अखंड वीज पुरवल्या जाते. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना केवळ ८ तास वीज पुरवल्या जाते, तिचाही भरवसा येता येत नाही, त्यामुळं शेतकरी शेतीसाठी तेलंगणात (Telangana) येत असल्याचं रावांचं म्हणणंय. 

 राज्यातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा शेजारच्या राज्यातले मंत्री जाणून घेताहेत अन महाराष्ट्र सरकार मात्र शेतकऱ्यांकडून वीजबिलांच्या वसुलीसाठी आडून बसतेय , ही गोष्ट तशी धक्कादायकच मानावी लागेल. 

रावांनी यापूर्वीही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्येबाबत भाष्य केलेलं आहे. महाराष्ट्रात पूर्वी भाजपचं सरकार सत्तेत होतं आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आहे, मात्र या दोन्ही सरकारला शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध करून देण्याची किमया करता आली नसल्याची टीका राव यांनी केलेली आहे. 

आता या टीकेकडे राजकीय दृष्टीनं पहायचं का शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध करून द्यायची ? हा प्रश्न मायबाप सरकारावरच सोपवायला हवा.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com