Maharashtra free from time to time: CM | Agrowon

विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त ः मुख्यमंत्री
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निकष पूर्ण करून महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. १८) सह्याद्री राज्य अतिथीगृहात केली. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. 

मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निकष पूर्ण करून महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. १८) सह्याद्री राज्य अतिथीगृहात केली. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. 

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यात राज्य हागणदारीमुक्त होणार होते. मात्र, पाणीपुरवठा स्वच्छता आणि ग्रामविकास विभागाने अत्यंत चांगले काम केल्याने विक्रमी वेळेत हागणदारीमुक्त महाराष्ट्र करण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. नांदेडमध्ये एका वर्षात दोन लाख, यवतमाळमध्ये शेवटच्या सहा महिन्यात दीड लाख तर गडचिरोलीत ५४ हजार शौचालयांचे काम करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक अथवा सार्वजनिक शौचालय उपलब्ध झाल्याने राज्याला हागणदारीमुक्त करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात असलेल्या शौचालयांचा वापर कारण्यासंदर्भात देशपातळीवर विविध उपक्रम आणि जाहिराती करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

गेल्या २०१७-१८ या आर्थिक वर्षात २२ लाख ५१ हजार ८१ शौचालयांची निर्मिती करण्यात आली तर २ लाख ८१ हजार २९२ सामूहिक अथवा सार्वजनिक शौचालयांचे काम झाले. गेल्या ६५ वर्षात राज्यात फक्त ४५ टक्के शौचालयांची निर्मिती झाली तर युती शासनाच्या काळात ५५ टक्क्यांवर शौचालयांची बांधकामे झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

इतर बातम्या
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...