March to remain hotter than normal
March to remain hotter than normal

अबब… मार्चमध्येच राज्यातील ‘या’ भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान!

राज्यात मार्च महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली असून मे महिन्यापर्यंत राज्याची काय स्थिती राहील, वाचा थोडक्यात.

मार्च ते मे या कालावधीत राज्यात उन्हाळा असतो. या काळात देशात कुठे किती तापमान राहील, याचा हवामान अंदाज (weather forecast) आज (मंगळवार ता. ०१) जाहीर केला गेला. त्यानुसार राज्यात यंदा मार्चमध्येच नेहमीपेक्षा जास्त ऊन राहण्याची शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा (DGM, IMD) यांनी दिल्लीत आयोजित ऑनलाईन पत्रकार परिषदेत पुढील तीन महिन्यांचा हवामान अंदाज जाहीर केला. त्यानंतर जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यातील स्थिती स्पष्ट होते.

Outlook for Temperature and Rainfall during March to May 2022 - By Dr. M Mohapatra, DGM, IMD Youtube Link: : https://t.co/KZVORnpf0G Facebook Link: https://t.co/uo90EeyzFU

— India Meteorological Department (@Indiametdept)

यंदा उन्हाळ्याची (summer season) चाहूल लवकर लागली असून त्याला हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजाने एकप्रकारे दुजोरा मिळाला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहण्याची दाट शक्यता आहे. उत्तर कोकण आणि खानदेश यंदा जास्त तापण्याची चिन्हे आहेत. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहू शकते. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरी इतकेच असेल, असा अंदाज आहे.

गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून, म्हणजेच फेब्रुवारीच्या मध्यापासूनच विदर्भ आणि मराठवाड्यातील कित्येक ठिकाणी तापमान तीस ते पस्तीस अंश सेल्सिअसच्या पार पोहोचले आहे. परिणामी, हरभऱ्यासहित इतर रब्बी पिकांच्या काढणीचे वेळापत्रकही विस्कळीत झाले आहे. आता शेतकऱ्यांना हवामानशास्त्र विभागाचा अंदाज लक्षात घेऊन भाजीपाला आणि उन्हाळ पिकांचे व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com