Marathi Agri agricultural News agitation continue in agriculture university Akola Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे अव्यावसायिक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण भत्ता तसेच विविध शिष्यवृत्त्या मिळत नाहीत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी तसेच अवाजवी शिक्षण शुल्क कमी करावे यांसह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. १६) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मुख्यालयात रजिस्ट्रार कार्यालयासमोर धरणे दिले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत आपल्या स्तरावरील मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. 

अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे अव्यावसायिक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण भत्ता तसेच विविध शिष्यवृत्त्या मिळत नाहीत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी तसेच अवाजवी शिक्षण शुल्क कमी करावे यांसह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. १६) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मुख्यालयात रजिस्ट्रार कार्यालयासमोर धरणे दिले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत आपल्या स्तरावरील मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. 

मागण्यांबाबत विद्यार्थ्यांनी पालकमंत्री बच्चू कडू तसेच विद्यापीठ प्रशासनाला यापूर्वीच निवेदन दिले होते. निवेदनात म्हटले, की कृषीचे पदव्युत्तर शिक्षण हे अव्यावसायिक असल्याने शिष्यवृत्या मिळत नाहीत. विविध प्रकारच्या फीसुद्धा वाढविण्यात आल्या आहेत. या शुल्काबाबत पुनर्विचार केला जावा. कृषीचे शिक्षण घेणारी सर्व शेतकऱ्यांची मुले आहेत आणि विद्यापीठ दरवर्षाला ४५ हजारापर्यंत शुल्क वसुल करीत आहे. याशिवाय मेस आणि इतर शैक्षणिक खर्च मोठा आहे. विद्यार्थ्यांच्यादृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे. रविवारी कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी आंदोलनस्थळी भेट देत या आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. विद्यापीठस्तरावरील मागण्यांवर समाधानकारक तोडगा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३०...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...
‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी...अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत...
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी...पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक...
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका...पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या...मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाईपुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस,...
कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार...पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी...
लॉकडाऊनमुळे कृषी यांत्रिकीकरणाचे ९...पुणे: राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण मोहिमेला...
सांगलीतील नागवेलीच्या पानांना मागणी...सांगली : कोरोना विषाणूमुळे परराज्यातून...
कराडमधील ग्राहकांच्या घरी १४० पेट्या...रत्नागिरी : ऐन हंगामात ‘कोरोना’च्या...
पीकविम्याची रक्कम कर्जखात्यांत जमा करू...अकोला : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर बँकांनी खरीप...
मोफत धान्य देण्यासंदर्भात केंद्राचे...मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या...
‘जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत ‘सोशल...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
आठवड्याचा अंदाज : ढगाळ हवामानासह...महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतके...
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...