Marathi Agri agricultural News agitation for milk rate Kolhapur Maharashtra | Agrowon

दूध दरप्रश्नी कोल्हापुरात भाजपचा ‘रास्ता रोको’

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

कोल्हापूर  : दुधाला प्रतिलिटर १० रुपये तर दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने शनिवारी (ता.१) महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूर  : दुधाला प्रतिलिटर १० रुपये तर दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने शनिवारी (ता.१) महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये आणि दूध पावडरसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे ही भाजपची मागणी आहे. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भाजपच्या वतीने शनिवारी आंदोलन करण्यात आले. सर्व घटकांना जगवणारा शेतकरी वर्ग समाधानी असला पाहिजे. त्यासाठी दुधाला योग्य दर मिळाला नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी दिला.

यावेळी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, भाजप किसान सेलचे अध्यक्ष भगवान काटे, जय शिवराय किसान मोर्चाचे अध्यक्ष शिवाजीराव माने, ‘रिपाई’चे उत्तम कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले .

उदगावमध्ये ‘रयत’सह मित्रपक्षांचे आंदोलन
गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये तर दूध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो ५० रुपयांचे अनुदान द्यावे व दूध खरेदी दर प्रतिलिटर ३० रुपये करावा या मागणीसाठी भाजप, रयत क्रांती, ‘रासप’, ‘आरपीआय’, ‘शिवसंग्राम’, आठवले गटाच्या पदाधिका-यांनी उदगाव (ता. शिरोळ) येथील गोकुळ दूध संघाच्या शाखेसमोर जनावरांसह युवा अध्यक्ष पृथ्वीराज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले.

आंदोलनात गायी, म्हशींसह दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर उदगाव येथे येणारे सर्व दुधाचे टँकर अडवण्यात आले. यावेळी जयसिंगपूर मंडलचे रमेश यळगुडकर, मिंलीद भिडे, राजेंद्र दाईगडे, विनायक अनेगिरीकर, दिलीप माणगांवे, आकाश राणे, संतोष जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी दुधाला मिळत असलेला भाव व शेतक-यांची झालेली अर्थिक कोंडी यावरून सरकारवर टिका केली. त्यानंतर तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.

यावेळी नगरसेवक डॉ. अरविंद माने, गजानन संकपाळ, दादासो कोळी, पंकज गुरव, वसंत पवार, सुनील ताडे, हरीश सूर्यवंशी, श्रीवर्धन देशमुख, सुनिल ताडे, सुहास राजमाने, अभिद्रम मुजावर, संजय वैघ, जयपाल कांबळे, संजय शिंदे, रणधीर राजमाने, कुलदीप देशपांडे, पोपट पुजारी, महेश देवताळे, महावीर तकडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
--
 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...