Marathi Agri agricultural News agitation for milk rate Nashik Maharashtra | Agrowon

दूध दरप्रश्नी महायुतीचे नाशिक जिल्ह्यात आंदोलन

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

 नाशिक ः दूध दरप्रश्नी भाजपसह रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, आरपीआय या घटक पक्षांच्यावतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी शनिवारी (ता.१) आंदोलन करण्यात आले. 

नाशिक  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दूध विक्रीत घट झाली. उत्पादनानंतर दूध वितरणात अडचणीत आल्याने दूध उत्पादक अडचणीत सापडले. या पार्श्वभूमीवर निवेदने देऊनही सरकारने दुर्लक्ष केल्याने दूध दरप्रश्नी भाजपसह रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, आरपीआय या घटक पक्षांच्यावतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी शनिवारी (ता.१) आंदोलन करण्यात आले. 

सटाणा शहरात देव मामलेदार यशवंतराव महाराज मंदिरापासून सकाळी ९ वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. येथे ज्येष्ठ शेतकऱ्यांचे पाण्याने हातपाय धुऊन हे पाणी भांड्यात जमा करून या पाण्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला. तसेच महायुतीच्या माध्यमातून सटाणा तालुक्यात देवमामलेदार यशवंत महाराज मंदिरात देवाला राज्यातील तीन चाकी शासनास सुबुद्धी दे असे साकडे घालण्यात आले.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश सदस्य दिपक पगार, युवराज देवरे, डोंगर पगार, भाजप तालुकाध्यक्ष संजय देवरे, ‘रासप’चे महेंद्र अहिरे,‘आरपीआय’चे बापूराव खरे यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गरीब कुटुंबांना दूध वाटप करण्यात आले. जर शासन शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत नसेल तर गनिमी पद्धतीने या पुढील आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. 

नाशिक तालुक्यातील दहावा मैल येथील आंदोलनात खासदार डॉ.भारती पवार सहभागी झाल्या होत्या. सिद्ध पिंप्री येथे आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे यांनी दूध दरप्रश्नी आंदोलन केले. यावेळी सिद्धेश्वर दूध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब ढिकले यांनी ग्रामस्थांना दूध वाटप केले.

येवला तालुक्यातील तळवाडे येथे आंदोलनाप्रसंगी ‘’आरपीआय’’चे जिल्हा सरचिटणीस संजय पगारे यांनी दुधाचे संकलन करून ते गरम करून गोरगरिबांना वाटले. जिल्ह्यात आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. हे आंदोलन महायुतीने पुकारले होते. मात्र सटाणा शहरात कार्यकर्ते व भाजप आमदार दिलीप बोरसे यांनी वेगवेगळी आंदोलन केल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे. 


इतर बातम्या
सिंधुदुर्गात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन...
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
मोर मध्यम प्रकल्पाच्या कालवा...हिंगोणा, जि. जळगाव ः सातपुडा पर्वतातील मोर...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
खेडे स्वयंपूर्ण, तर राज्य, देश...नाशिक : ‘‘कोविड- १९ च्या या परिस्थितीत...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यातील १७८...सोलापूर : ‘‘सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा...
प्रविण कसपटे ठरले सर्वाधिक बिझनेस...बार्शी : येथील युवा उद्योजक प्रविण कसपटे यांनी...