आधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत पोचावे : कृषिमंत्री दादा भुसे

यवतमाळ : कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी राज्यात कृषी संजीवनी सप्ताह राबविला जात आहे. पीक उत्पादकता वाढावी, गुणवत्ता सुधारावी, याकरिता आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचावे, अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.
शेतीशाळेतील महिलांशी संवाद साधताना कृषिमंत्री दादा भुसे
शेतीशाळेतील महिलांशी संवाद साधताना कृषिमंत्री दादा भुसे

यवतमाळ : कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी राज्यात कृषी संजीवनी सप्ताह राबविला जात आहे. पीक उत्पादकता वाढावी, गुणवत्ता सुधारावी, याकरिता आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचावे, अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.

मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथे महिलांच्या शेतीशाळेत तसेच ज्योती बंडूजी धाने यांच्या शेतावर रविवारी (ता. ५) शेतकऱ्यांशी संवाद साधताना श्री. भुसे बोलत होते. या वेळी वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, माजी आमदार विश्वास नांदेकर, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.

या वेळी श्री. भुसे म्हणाले, की कृषी संजीवनी सप्ताहादरम्यान कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बांधावर जात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. आगामी काळात शेतीतील शारीरिक कष्टाची कामे तांत्रिक पद्धतीने कशी करावीत, याविषयी प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच फवारणी यंत्र कोणते वापरावे, त्याचे नोझल कोणते वापरावे, रासायनिक खतांचा वापर कसा कमी करता येईल, विषबाधेच्या दुर्घटना कशा थांबवता येतील, या सर्व बाबींचेसुद्धा प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जाईल. बियाणे उगवण क्षमता तपासणीचा प्रयोग केला होता का, तो कसा केला, तुम्ही केलेल्या प्रयोगातून नवीन काही शिकायला मिळाले का, इतरांनी काय सुधारणा कराव्या आदी माहिती कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. 

या वेळी कृषिमंत्री भुसे, वनमंत्री राठोड यांनी हटवांजरी येथील शेतीशाळेतील महिलांशी शेतावर जाऊन संवाद साधला. फूल नांगरणीचे फायदे काय, वखरणी, बियाण्यांची निवड कशी करावी याबाबतदेखील त्यांनी महिला शेतकऱ्यांकडे विचारणा केली. या वेळी निंबोळीपासून खत बनवण्याचे प्रात्यक्षिक मंत्री भुसे यांना दाखवण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com