‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा टप्पा सुरु : अजित पवार

टाळेबंदीमुळे देश, राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आली असली तरी त्यावर नंतरच्या काळात मात करता येईल. परंतु, आता ‘कोरोना’चा लढा हा एकजुटीनेच लढला पाहिजे. ही लढाई सर्वांची आहे. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिक या लढ्यात एकजुटीने उतरले आहेत ही बाब बळ देणारी आहे. तसेच ही एकजूटच या लढाईत यश मिळवून देईल. - अजित पवार, उपमुख्यमंत्री.
उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला आहे. ज्या नागरिकांमध्ये ‘कोरोना’ची लक्षणे आहेत किंवा ‘कोरोना’च्या दृष्टीने संशयित आहे त्यांनी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तत्काळ संपर्क साधावा. ‘कोरोना’विरुद्धचा लढा लवकर संपला पाहिजे, त्यासाठी संशयितांनी पुढे यावे. अन्य नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य करावे. संशयित व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरित कळवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

श्री. पवार म्हणाले, की राज्यात ‘कोरोना’ बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. तरीही परिस्थितीचे गांभीर्य काही जणांच्या लक्षात येत नाही. राज्यातील डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस, सफाई कर्मचारी अशा ‘कोरोना’विरुद्ध लढणाऱ्या यंत्रणेतील घटकांमध्ये ‘कोरोना’चा संसर्ग दिसू लागला आहे. हे चिंताजनक आहे. हा प्रसार थांबवायचा असेल तर ‘कोरोना’ची साखळी तोडणे आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी घरात थांबणे, संशयित व्यक्तींनी हॉस्पिटलमध्ये दाखल होणे हाच प्रभावी मार्ग आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com