पुणे कृषी महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविण्यात माजी विद्यार्थ्यांचा मोठा वाटा ः डॉ. मासाळकर

पुणे कृषी महाविद्यालयातील १९७० मधील कृषी पदवीधर बॅचचे स्नेहसंमेलन रविवारी झाले.
पुणे कृषी महाविद्यालयातील १९७० मधील कृषी पदवीधर बॅचचे स्नेहसंमेलन रविवारी झाले.

पुणे  ः पुणे कृषी महाविद्यालयात ५० वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन होत असून, हा स्तुत्य उपक्रम आहे. असे उपक्रम वारंवार होणे अपेक्षित आहे. या महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविण्यात माजी विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील मासाळकर यांनी केले.  

पुणे कृषी महाविद्यालयात १९७० मधील कृषी पदवीधर बॅचचे स्नेहसंमेलन शिरनामे सभागृहात रविवारी (ता. ९) पार पाडले. यावेळी राज्यसभेचे माजी खासदार विठ्ठलराव जाधव, बावस्कर टेक्नॉलॉजीचे चेअरमन व्ही.एस. बावसस्कर, डीएसटीए सल्लागार डॉ. सुभाष शिंदे, कृषी विद्याचे विभागप्रमुख चंद्रकांत गायकवाड, अनंत डुंबरे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे, बी. के. जगताप, ऊसतज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव हापसे, ए. व्ही. तेंडुलकर, सुरेश डेरे, रूद्र संस्थेचे अध्यक्ष खाशेराव गलांडे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. साबळे म्हणाले, की देशातील सर्वात पहिले पुणे कृषी महाविद्यालय त्यानंतर नागपूर, कोईमतूर, पाकिस्तानातील लालपूर ही चार कृषी महाविद्यालये ब्रिटिशांनी १९०७ च्या दरम्यान स्थापन केली. त्या वेळी पुणे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य हे महाराष्ट्राचे विशेषज्ञ होते. हे कृषी महाविद्यालय मुंबई विद्यापीठाअंतर्गत होते. १९५८ मध्ये पुणे विद्यापीठाअंतर्गत होते. १९६९ मध्ये महाराष्ट्र विद्यापीठ तर १९७० मध्ये राहुरी कृषी विद्यापीठाअंतर्गत होते. ही महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत पहिली बॅच आहे. त्या काळात मर रोगावर पहिल्यादा पुणे कृषी महाविद्यालयात संशोधन झाले. त्यानंतर सेंद्रीय शेती ही अल्बर्ट हावर्ड यांनी सुरू केली होती. ल्युटंट हे पुणे कृषी महाविद्यालयाचे आर्किटेक्चर होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बॅंका, कृषी विभाग, राजकीय अशा विविध क्षेत्रात वरिष्ठ पदावर काम केले आहे.    

विठ्ठलराव जाधव म्हणाले, कृषी विद्या विभागात मी दहा वर्षे काम केले. त्यामुळे अनेक विद्यार्थी माझ्या हाताखालून गेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन विविध क्षेत्रात आपला उमटविला आहे. या वेळी सुरेश डेरे यांनी प्रास्तविक केले. डॉ. रामचंद्र साबळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com