marathi agri agricultural news assembly winter session starts from monday mumbai maharashtra | Agrowon

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस चालणार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 डिसेंबर 2019

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून (ता. १६) नागपुरात सुरू होणार आहे. या अधिवेशनाचे कामकाज शनिवारपर्यंत (ता. २१) चालणार आहे. 

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक मंगळवारी (ता. १०) पार पडली. या वेळी अधिवेशनातील कामकाज निश्चित करण्यात आले. बैठकीला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदींसह इतर मंत्री उपस्थित होते.  

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून (ता. १६) नागपुरात सुरू होणार आहे. या अधिवेशनाचे कामकाज शनिवारपर्यंत (ता. २१) चालणार आहे. 

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक मंगळवारी (ता. १०) पार पडली. या वेळी अधिवेशनातील कामकाज निश्चित करण्यात आले. बैठकीला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदींसह इतर मंत्री उपस्थित होते.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचे हे पहिलेच हिवाळी अधिवेशन आहे. एकूण सहा दिवस अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे. पहिल्या दिवशी (सोमवारी) अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येतील, त्यासोबतच पुरवणी मागण्या विधिमंडळात मांडण्यात येणार आहेत. दुसऱ्या (मंगळवारी) आणि तिसऱ्या दिवशी (बुधवारी) राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा केली जाईल. चौथ्या (गुरुवारी) आणि पाचव्या दिवशी (शुक्रवारी) पुरवणी मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे. तसेच पाचव्या दिवशी पुरवणी विनियोजन विधेयक मांडले जाईल. सहाव्या दिवशी (शनिवारी) अशासकीय कामकाजानंतर अधिवेशनाची सांगता होणार आहे.


इतर अॅग्रो विशेष
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...