marathi agri agricultural news bio fertilizers weather recording equipment determined attraction pune maharashtra | Agrowon

नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते, शेतातील हवामान नोंद उपकरणे ठरली आकर्षण

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 डिसेंबर 2019

पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डिझाइन इनोव्हेशन केंद्र संलग्नित उपकेंद्रात संशोधित आणि तयार करण्यात आलेली जैविक खते, बायो-कम्पोस्टर, शेतातील हवामानाच्या नोंदी करणारी अरोसेन्स व अटोफार्म आदी उपकरणे नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय डिझाइन इनोव्हेशन केंद्राच्या प्रदर्शनात सादर करण्यात आली. ही उपकरणे या प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डिझाइन इनोव्हेशन केंद्र संलग्नित उपकेंद्रात संशोधित आणि तयार करण्यात आलेली जैविक खते, बायो-कम्पोस्टर, शेतातील हवामानाच्या नोंदी करणारी अरोसेन्स व अटोफार्म आदी उपकरणे नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय डिझाइन इनोव्हेशन केंद्राच्या प्रदर्शनात सादर करण्यात आली. ही उपकरणे या प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नावीन्यपूर्ण उत्पादने व तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यात विजेवरील पुरण यंत्र, पंक्चर अवस्थेतही वाहन पुढे जाण्याची व्यवस्था, शरीरात जाणाऱ्या व बाहेर येणाऱ्या हवेचे तापमान मोजणारे यंत्र (ब्रीथ मीटर), तोंडातून घ्यावयाची डीपीटी लस, सिकलसेल ॲनिमियासाठी वनस्पतिजन्य उपचार, स्ट्रेस फायटर, बेसिमिक्स, ट्रायकोक्युअर ही जैविक खते, बायो-कम्पोस्टर, शेतातील हवामानाच्या नोंदी करणारी अरोसेन्स व अटोफार्म या उपकरणांचा समावेश आहेत. या तंत्रज्ञान आणि उपकरणांचे सादरीकरण अखिल भारतीय डिझाइन इनोव्हेशन केंद्राच्या प्रदर्शनात करण्यात आले होते.

याबाबत विद्यापीठाच्या डिझाइन इनोव्हेशन केंद्राचे समन्वयक डॉ. अरविंद शाळिग्राम म्हणाले, की या प्रदर्शनात उत्पादनांबरोबरच डिझाइन इनोव्हेशन या विषयावरील विविध अभ्यासक्रम आणि घेण्यात येणारे विविध उपक्रमही प्रदर्शित करण्यात आले होते. डिझाइन इनोव्हेशन केंद्राच्या अंतर्गत सध्या पाच स्टार्टअप्स स्थापन करण्यात आले आहेत. त्यांनीही आपली उत्पादने या प्रदर्शनात सादर केली होती.

या अखिल भारतीय प्रदर्शनात देशभरातून एकूण २० डिझाइन इनोव्हेशन केंद्रे आणि त्यांची सुमारे ६० उपकेंद्रे सहभागी झाली होती. विद्यापीठाच्या वतीने डॉ. पूजा दोशी, गोपाळ श्रीवास्तव, समता आढाव, अरुण आयनोदकर, अविनाश जमदाडे, डॉ. योगेश कुलकर्णी, डॉ. सुवर्णा पाटील सहभागी झाले. 


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...
लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी...लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात हमी...
शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक...नाशिक : वाढत्या लोकसंख्येचा भार कृषी क्षेत्रावरही...
अकोला : तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीत...अकोला  ः शासनाकडून हमी भावाने तूर खरेदीसाठी...
भंडारा : शेतकरी किसान सन्मानच्या...भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा...
कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढसांगली  ः कवठेमहांकाळ तालुक्यात ऑक्टोबर...
खानदेशात कांदा लागवड सुरूचजळगाव ः खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे...
असे करा घाटेअळीचे जैविक व्यवस्थापनघाटेअळी नियंत्रणासाठी सातत्याने रासायनिक...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...