Marathi Agri agricultural News Cabinet expansion tomorrow mumbai maharashtra | Agrowon

मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 डिसेंबर 2019

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या (ता. ३०) होणार आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात ३६ मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची चर्चा आहे. या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सध्या विधान भवनात सुरू आहे.

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या (ता. ३०) होणार आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात ३६ मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची चर्चा आहे. या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सध्या विधान भवनात सुरू आहे.

नव्या मंत्री आणि राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा ३० डिसेंबरला दुपारी १ वाजता विधानभवनाच्या प्रांगणात पार पडणार आहे. यापूर्वी हा शपथविधी सोहळा राजभवनावर होणार अशी चर्चा होती. मात्र शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची संख्या आणि त्यांच्या समवेत या सोहळ्याला त्यांचे नातेवाईक, पक्षाचे कार्यकर्ते, आमदार तसेच राजकीय नेते असा मोठा लवाजमा उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने राजभवनावर होणारा शपथविधी सोहळा आता विधानभवनाच्या प्रांगणात होणार आहे. 

काँग्रेसच्या मंत्र्यांची नावे निश्चित न झाल्यामुळे २४ डिसेंबरला होणारा मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलण्यात आला होता. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दोनच दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथिगृहावर चर्चा झाली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी तयार आहे. मात्र काँग्रेसची यादी तयार नसल्याची चर्चा होती. मात्र काँग्रेसच्या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची यादी तयार असल्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. 

राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा २८ नोव्हेंबरला शिवतीर्थावर पार पडला होता. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती. पण काही ना काही अडचणींमुळे या विस्ताराला मुहूर्त मिळत नव्हता. महाराष्ट्र विकास आघाडीच्या येत्या ३० डिसेंबरला होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १० कॅबिनेट, ३ राज्यमंत्री आणि काँग्रेसचे १० मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये तिन्ही पक्षांकडून आपापल्या मित्र पक्षांना आणि अपक्षांना या विस्तारात सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून प्रहार संघटनेने बच्चू कडू तर काँग्रेसकडून सपाचे अबू आझमी यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...