marathi agri agricultural news chandrakant patil gives challenge to opposition parties aurangabad maharashtra | Agrowon

हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या : चंद्रकांत पाटील

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

औरंगाबाद  : राज्यातील गावा-गावांतील रस्ते, १२ हजार कोटींच्या पाणी योजना, सारथी म्हणजेच मराठा-कुणबींना सुविधा असे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय रद्द करून तुम्ही कुणावर सूड उगवताय? हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या, आम्ही तयार आहोत, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. जे निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत, ते रद्द करून काय मिळवणार आहात, असा सवालही श्री. पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता केला आहे. 

औरंगाबाद  : राज्यातील गावा-गावांतील रस्ते, १२ हजार कोटींच्या पाणी योजना, सारथी म्हणजेच मराठा-कुणबींना सुविधा असे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय रद्द करून तुम्ही कुणावर सूड उगवताय? हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या, आम्ही तयार आहोत, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. जे निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत, ते रद्द करून काय मिळवणार आहात, असा सवालही श्री. पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता केला आहे. 

औरंगाबादमध्ये सोमवारी (ता. ९) भाजपची विभागीय आढावा बैठक झाली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्यासह माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, बाल हक्‍क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे, माजी मंत्री बबनराव लोणीकर, माजी राज्यमंत्री अतुल सावे, प्रदेश प्रवक्‍ते शिरीष बोराळकर, आमदार सुरजितसिंह ठाकूर उपस्थित होते.

बैठकीपूर्वी बोलताना श्री. पाटील यांनी सरकारच्या निर्णयाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. मराठा आणि कुणबी समाजाच्या हितासाठी आमच्या सरकारने सारथी ही स्वायत्त संस्था स्थापन केली होती. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची त्या ठिकाणी नियुक्ती करून मराठा समाजातील तरुणांच्या विकासासाठी कार्य सुरू केले होते. मात्र, सरकार ‘सारथी’सारख्या संस्थेची स्वायत्तता काढून घेते. थोडक्यात काय तर त्यांना काहीच करायचे नाही, असे श्री. पाटील या वेळी म्हणाले.

भाजपने विकासासाठी निवडणुका लढल्या आहेत. शिवसेनेसोबत ३५ वर्षे महापालिकेत होतो. आता शिवसेना महाआघाडीसोबत गेल्यामुळे पाच महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढेल. सर्वसामन्यांना जे सरकार हवे ते सरकार आणण्यासाठी स्वाभाविकपणे लोकांचे सेवक होणे ही आमची जबाबदारी असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

जानेवारीत राज्याध्यक्षांची निवड
भाजपच्या तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. आजवर सगळ्या निवडणुका रेंगाळल्या होत्या. त्याला गती देण्यासाठी राज्यात विभागनिहाय संघटनात्मक आढावा घेत आहोत. राज्यातील भाजपच्या सोयीने संघटनात्मकदृष्टया ७० जिल्हे करण्यात आले आहे. यात मराठवाड्यात १२ जिल्हे करण्यात आले आहे. त्यांच्या निवडणुका ३० डिसेंबरपुर्वी पूर्ण होणार आहे. यानंतर १ ते ५ जानेवारी दरम्यान राज्याचा अध्यक्ष त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाणार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

आजारी असल्याने पंकजा मुंडे अनुपस्थित
पंकजा मुंडे बैठकीला का आल्या नाहीत असे विचारल्यानंतर, बैठकीला येत असताना पंकजा मुंडे यांच्याशी बोलेणे झाले. तब्येत ठिक नसल्यामुळे आणि गुरुवारच्या (ता.१२) मेळाव्याची तयारी करायची असल्यामुळे आपण बैठकीला येऊ शकत नसल्याचे त्यांनी आपल्याला सांगितल्याचे श्री. पाटील म्हणाले.


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...