ग्रामीण भागातील जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पाच वर्षांपासून ‘सोसायटी फॉर एन्व्हायर्न्में
ताज्या घडामोडी
शिवनेरीवरून कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता
पुणे ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरुवारी) शिवनेरी किल्ल्यावर येत आहेत. या वेळी मुख्यमंत्री ठाकरे कोणत्या घोषणा करणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. श्री. ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा मुंबई बाहेरील हा पहिलाच जाहीर दौरा आहे. यानिमित्ताने ते शिवनेरीवरून शेतकऱ्यांची कर्जमाफी करीत सातबारा उतारा कोरा करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
पुणे ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरुवारी) शिवनेरी किल्ल्यावर येत आहेत. या वेळी मुख्यमंत्री ठाकरे कोणत्या घोषणा करणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. श्री. ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा मुंबई बाहेरील हा पहिलाच जाहीर दौरा आहे. यानिमित्ताने ते शिवनेरीवरून शेतकऱ्यांची कर्जमाफी करीत सातबारा उतारा कोरा करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
श्री. ठाकरे हे गड किल्ले संवर्धनासाठी आग्रही आहेत. राज्य शासनाच्या वतीने २००२ पासून शिवनेरी संवर्धन आणि विकास सुरू आहे. यामुळे हा किल्ला किल्ले संवर्धनाचे माॅडेल ठरणार असल्याने राज्यातील गड किल्ले संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य गड किल्ले संवर्धन आणि विकास महामंडळाची स्थापना करावी, अशी मागणी जुन्नर येथील सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेसह माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे २००७ पासून करीत आहेत. या मागणीचे निवेदन आढळराव यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना दिले आहे. शिवनेरीवरील अंबरखाना इमारतीत सातवाहन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालयाची देखील मागणी आहे. त्यामुळे या दोन्ही मागण्या मंजूर होण्याची घोषणादेखील मुख्यमंत्री ठाकरे करण्याची शक्यता आहे.
रसायनमुक्त भाजीपाला क्लस्टरचा प्रकल्प अहवाल सादर करा
शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी जुन्नर तालुक्यात रसायनमुक्त भाजीपाला क्लस्टर उभारण्याची मागणी माजी खासदार आढळराव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मात्र ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही. हीच मागणी आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भेट घेऊन केली आहे. या वेळी क्लस्टर आणि शिवनेरीवरील संग्रहालयाबाबत ठाकरे यांनी विशेष रस दाखवत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.
आज (ता. १२) ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे. यंदा अवकाळी पाऊस आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बळिराजा कृतज्ञता दिवस साजरा करत आहे. याच दिवशी मुख्यमंत्री ठाकरे शिवनेरीवर येत आहेत. या वेळी ते कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ही भेट शरद पवार यांच्या वाढदिवशी त्यांच्यासह शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून मिळण्याची शक्यता आहे.
- 1 of 1027
- ››