धनगर आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी कार्यवाही करू ः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई :  धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ती सगळी पावले उचलली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता.२) विधान परिषदेत दिली. 

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून गदारोळ झाल्यामुळे विधान परिषदेच्या कामकाजात दोनदा व्यत्यय आला. धनगर समाज आरक्षणाबाबत टाटा सामाजिक संस्थेच्या अहवालासंदर्भात येत्या शुक्रवारी महाधिवक्त्यांसोबत बैठक घेण्यात येईल. या बैठकीला मुख्यमंत्री आणि संबंधित विधिमंडळ सदस्यांना बोलवावे असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी दिले. या संदर्भात काँग्रेसच्या रामहरी रुपनवर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. अहवालावर महाधिवक्त्यांचा अभिप्राय आल्यानंतर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी दिली.

मात्र धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे ही मागणी विरोधकांनी लावून धरली, त्यामुळे कामकाज पहिल्यांदा पाच मिनिटांसाठी आणि नंतर दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. धनगर आंदोलनातील गंभीर गुन्हे वगळता सर्व गुन्हे मागे घेतले जातील आणि तपास करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी सांगितले.   ‘विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे  पैसे महिनाअखेरपर्यंत देऊ’ समाजकल्याण विभागाच्या लाभार्थी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रलंबित पैसे येत्या ३१ मार्चपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होतील, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत दिले. या संदर्भात भाजपचे गिरीश व्यास यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला श्री. मुंडे यांनी उत्तर दिले. आतापर्यंत ८० ते ९० टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे दिले गेले आहेत, काही विद्यार्थ्यांचे पैसे तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित आहेत, असे श्री. मुंडे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com