वऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंब

अकोला ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले तरी प्रकल्प भरण्यासाठी हा पाऊस फायदेशीर ठरला आहे. वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यातील मोठे, मध्यम तसेच लघू प्रकल्प यंदा तुडुंब भरले आहेत.
काटेपूर्णा प्रकल्पातून सातत्याने विसर्ग करावा लागल्याने नदी पात्रही असे ओसंडून वाहत होते.
काटेपूर्णा प्रकल्पातून सातत्याने विसर्ग करावा लागल्याने नदी पात्रही असे ओसंडून वाहत होते.

अकोला  ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले तरी प्रकल्प भरण्यासाठी हा पाऊस फायदेशीर ठरला आहे. वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यातील मोठे, मध्यम तसेच लघू प्रकल्प यंदा तुडुंब भरल्याने आगामी रब्बीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काटेपूर्णा, खडकपूर्णा, वान, नळगंगा, पेनटाकळी हे सर्वच मोठे प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यात चांगला पाऊस झाल्याने प्रकल्पांतील साठा वेगाने वधारला. प्रामुख्याने मोठे प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरले आहेत. काटेपूर्णा प्रकल्प यंदा आॅगस्टमध्येच भरला. सप्टेंबरमध्ये यातून अनेकदा विसर्ग करावा लागला आहे. वान प्रकल्पातही आॅगस्टच्या मध्यापासून पाण्याची आवक जोमाने होत आहे. सध्या या प्रकल्पातील पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोचला आहे. खडकपूर्णा ९७, नळगंगा ८९ तर पेनटाकळी ९४ टक्के भरले आहेत. हे सर्व मोठे प्रकल्प पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत आहेत. तसेच रब्बीसाठी यातून शेतकऱ्यांना पाणी मिळत असते. आगामी रब्बीची येत्या आठवडाभरानंतर लगबग सुरू होणार आहे. त्यासाठी हा पाणीसाठा फायदेशीर ठरणार आहे.

मध्यम प्रकल्पही १०० टक्के भरले अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात असलेले मध्यम प्रकल्पसुद्धा यंदा पावसाळा संपण्यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरले आहेत. प्रामुख्याने अकोल्यातील मोर्णा, निर्गुणा, उमा, वाशीम जिल्हयातील सोनल, एकबुर्जी, बुलडाणा जिल्ह्यातील मन (९८.७५टक्के), ज्ञानगंगा, उतावळी, कोराडी, मस, तोरणा, पलढग हे सर्व मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.   

वऱ्हाडातील मोठ्या प्रकल्पांतील साठा
प्रकल्प  टीएमसी    टक्के
काटेपूर्णा २.९८ ९७.८६
वान  २.७५ ९५.१३
नळगंगा २.१९ ८९.८७
पेनटाकळी  १.९९ ९४.२१
खडकपूर्णा ३.१९  ९६.९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com