Marathi Agri agricultural News Dams overflow due to rain Akola Maharashtra | Page 2 ||| Agrowon

वऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंब

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

अकोला  ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले तरी प्रकल्प भरण्यासाठी हा पाऊस फायदेशीर ठरला आहे. वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यातील मोठे, मध्यम तसेच लघू प्रकल्प यंदा तुडुंब भरले आहेत.

अकोला  ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले तरी प्रकल्प भरण्यासाठी हा पाऊस फायदेशीर ठरला आहे. वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यातील मोठे, मध्यम तसेच लघू प्रकल्प यंदा तुडुंब भरल्याने आगामी रब्बीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काटेपूर्णा, खडकपूर्णा, वान, नळगंगा, पेनटाकळी हे सर्वच मोठे प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यात चांगला पाऊस झाल्याने प्रकल्पांतील साठा वेगाने वधारला. प्रामुख्याने मोठे प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरले आहेत. काटेपूर्णा प्रकल्प यंदा आॅगस्टमध्येच भरला. सप्टेंबरमध्ये यातून अनेकदा विसर्ग करावा लागला आहे. वान प्रकल्पातही आॅगस्टच्या मध्यापासून पाण्याची आवक जोमाने होत आहे. सध्या या प्रकल्पातील पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोचला आहे. खडकपूर्णा ९७, नळगंगा ८९ तर पेनटाकळी ९४ टक्के भरले आहेत. हे सर्व मोठे प्रकल्प पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत आहेत. तसेच रब्बीसाठी यातून शेतकऱ्यांना पाणी मिळत असते. आगामी रब्बीची येत्या आठवडाभरानंतर लगबग सुरू होणार आहे. त्यासाठी हा पाणीसाठा फायदेशीर ठरणार आहे.

मध्यम प्रकल्पही १०० टक्के भरले
अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात असलेले मध्यम प्रकल्पसुद्धा यंदा पावसाळा संपण्यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरले आहेत. प्रामुख्याने अकोल्यातील मोर्णा, निर्गुणा, उमा, वाशीम जिल्हयातील सोनल, एकबुर्जी, बुलडाणा जिल्ह्यातील मन (९८.७५टक्के), ज्ञानगंगा, उतावळी, कोराडी, मस, तोरणा, पलढग हे सर्व मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. 
 

वऱ्हाडातील मोठ्या प्रकल्पांतील साठा
प्रकल्प  टीएमसी    टक्के
काटेपूर्णा २.९८ ९७.८६
वान  २.७५ ९५.१३
नळगंगा २.१९ ८९.८७
पेनटाकळी  १.९९ ९४.२१
खडकपूर्णा ३.१९  ९६.९०

 


इतर ताज्या घडामोडी
‘स्वाभिमानी’ने जाळला केंद्र सरकारचा...नागपूर : शेतकरीविरोधी कृषी कायदे मागे घ्या,...
पीकविमा प्रकरणी न्यायालयीन लढा...नांदेड : पीकविमा प्रकरणी शरद जोशी प्रणीत...
‘त्या’ जिल्हा परिषदांच्या आरक्षणावर आज...अकोला  :  जिल्हा परिषद-पंचायत समितीमधील...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते २६०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस...कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या पंधरा...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
एफआरपीप्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील बैठक...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही...
नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...नांदेड : खरिपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी...
शहीद नितीन भालेराव अनंतात विलीननाशिक : भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलिस...
डाळिंब, आंब्याच्या विम्यासाठी ३१...नाशिक : ‘‘राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित...
परभणी, पाथरी, गंगाखेडमधील कापसाची...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
परभणीतील अपात्र शेतकऱ्यांकडून ‘शेतकरी...परभणी : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम- किसान...
खानदेशात रब्बीसाठी आवर्तनांची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात सर्वच प्रकल्पांमधील जलसाठे मुबलक...
औरंगाबाद, बीड जिल्ह्यात विशेष पथके...औरंगाबाद : औरंगाबाद व बीड जिल्ह्यात बिबट्याच्या...
जळगाव जिल्हा परिषदेत रिक्त पदांमुळे...जळगाव : ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा...
अंबड तालुक्यात चार ठिकाणी कापूस खरेदी...अंबड, जि. जालना : तालुक्यात चार ठिकाणी कापूस...
पपई उत्पादकांना खर्चही निघेनाअकोला : पारंपरिक पिकांची चाकोरी सोडत शेतकरी...
मराठवाड्यात तुरीवरच शेतकऱ्यांचे आर्थिक...औरंगाबाद : यंदा अतिपावसाने उडीद, सोयाबीनचे अतोनात...
खडकपूर्णा धरणाचे आवर्तन अखेर सुरूबुलडाणा : देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना...
...तर महावितरणचे कार्यालय जाळणार :  आ....अमरावती :  वरुड, मोर्शी तालुक्यांत...