Marathi Agri agricultural News district planning committee meeting nagar maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७१ कोटींची मागणी करणार ः हसन मुश्रीफ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 जानेवारी 2020

नगर ः जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडे ९७१ कोटींची मागणी केली जाईल. आगामी २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ५७१ कोटी ८० लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. नियोजन समितीच्या आराखड्यातील तरतूद करण्यात आलेला निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घ्या, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले. 

नगर ः जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडे ९७१ कोटींची मागणी केली जाईल. आगामी २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ५७१ कोटी ८० लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. नियोजन समितीच्या आराखड्यातील तरतूद करण्यात आलेला निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घ्या, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले. 

नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी झाली. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, नगरविकास खात्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, आमदार रोहित पवार, संग्राम जगताप, मोनिका राजळे, नीलेश लंके, आशुतोष काळे व किरण लहामटे या वेळी उपस्थित होते.  

बैठकीनंतर मुश्रीफ म्हणाले, की जिल्हा नियोजन समितीच्या ५७० कोटी ८१ लाख रुपयांच्या आराखड्यास २०१९-२० करिता मंजुरी मिळाली होती. मंजूर निधीपैकी ३४० कोटी ३४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यापैकी २८४ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर कामांसाठी वितरित करण्यात आला. डिसेंबरअखेर खर्च झालेला निधी १९६ कोटी ३६ लाख आहे. २०२०-२१ आराखड्यानुसार ५७१ कोटी ८० लाखांच्या आराखड्याला मान्यता दिली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सात कोटी ५० लाख रुपये वितरित करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.
 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजनेतून मिळणारा निधी (आकडे लाखांत) ः नगर महापालिका- २.५०, श्रीरामपूर नगर परिषद-१०६.४५, संगमनेर- ४१.९७, कोपरगाव- ७६.२०, राहुरी- ५३.४९, देवळाली प्रवरा- ४६.८४, राहाता- ४३.४७, पाथर्डी- ३८.४०, श्रीगोंदे- ४४.०१, जामखेड- ४६.९९, शिर्डी- ६०.५४, अकोले- ३३.०६, कर्जत- ३७.९४, पारनेर- २९.१२, शेवगाव- ५३.५३, नेवासे- ३७.९३. 

या देवस्थानांना ‘क’ वर्ग दर्जा ः सुद्रिकेश्‍वर महाराज देवस्थान, श्रीराम देवस्थान (ता. श्रीगोंदे), गणेश मंदिर ट्रस्ट (ता. कोपरगाव).


इतर बातम्या
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...