Marathi Agri agricultural News effect of corona issue on government meeting Mumbai Maharashtra | Agrowon

मंत्रालयातील सरकारी बैठकांवर निर्बंध

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 मार्च 2020

मुंबई  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच इतर कार्यालयांनी बैठका आयोजित करू नयेत, असे आदेश सामान्य प्रशासन विभगाने गुरुवारी (ता. १९) जारी केले आहेत. त्यामुळे मंत्रालयातील सरकारी बैठकांवर निर्बंध आले आहेत.

मुंबई  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच इतर कार्यालयांनी बैठका आयोजित करू नयेत, असे आदेश सामान्य प्रशासन विभगाने गुरुवारी (ता. १९) जारी केले आहेत. त्यामुळे मंत्रालयातील सरकारी बैठकांवर निर्बंध आले आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांवर आणली आहे. आता मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच त्यांच्या अखत्यारीतील कार्यालयांनी शक्यतो बैठकांचे आयोजन करू नये. गरज असेल तरच महत्त्वाच्या बैठका आयोजित कराव्यात. तसेच, विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टिकोनातून बैठकीला उपस्थित राहणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचा एकमेकांशी संपर्क होणार नाही अशाप्रकारे एक आसन सोडून पुरेसे अंतर ठेवण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचना सामान्य प्रशासन विभागाने केली आहे.
 
राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष
दरम्यान, कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर ६०३ क्रमांकाच्या दालनात राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष उघडण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाची जबाबदारी अतिरिक्त मुख्य आयुक्त राजीव जलोटा, प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...