Marathi Agri agricultural News Eknath Khadse speak about Midterm election Mumbai Maharashtra | Agrowon

राज्यात तूर्त मध्यावधी निवडणूक नाही : एकनाथ खडसे

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

मी माझ्या पक्षावर कधीही टीका केलेली नाही. माझी टीका एखाद्या वेळी व्यक्तीवर असू शकते. मी पक्षात सक्रिय आहे.
- एकनाथ खडसे, ज्येष्ठ नेते, भाजप.

मुंबई  : राज्यात तूर्तास तरी मध्यावधी निवडणूक होईल, असे वाटत नसल्याचे मत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे शनिवारी (ता. १५) आणि रविवारी (ता. १६) नवी मुंबईत राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी या अधिवेशनात श्री. खडसे बोलत होते. श्री. खडसे म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर मतांतरे आहेत. आता ही मतांतरे उघडपणे होत असून, ती वाढत आहेत. याअंतर्गत विरोधामुळेच हे सरकार मोडेल. असे असले, तरी मध्यावधी निवडणूक तूर्त होईल, असे मला वाटत नाही. त्यांनाही काही काळ द्यावा लागेल. 

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची तयारी करणार असल्याचे वक्तव्य  केले होते. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांचे मध्यावर्ती निवडणुकांवरील हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. भाजपमध्येच मध्यावधी निवडणुकांवरून दोन वेगळी मते असल्याचेही यानिमित्ताने समोर येत आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी भाजपला संघटनात्मक कामावर लक्ष देण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान, नेरुळमध्ये शनिवारी सकाळी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. रविवारी (ता. १६) जे. पी. नड्डा अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या वेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. या अधिवेशनात चंद्रकांत पाटील हे जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. तसेच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या अधिवेशनाचा समारोप करतील. भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आदी नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.
 


इतर ताज्या घडामोडी
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ओवाळली आरतीअकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात केळी...नांदेड : लॅाकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे....
मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा व्हावा,...
आंब्याची वाहतूक, वितरण व्यवस्थेतील...मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे...
कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला...कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे...
मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ‘कृषी’च्या...नाशिक: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
खानदेशात कडब्याच्या दरांवर दबाव जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा...
मदत व पुनर्वसन मंत्री देणार ४० हजार...चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार...
खानदेशात धान्याची शिवार खरेदी, मार्केट...जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे....
भंडारा बॅंक देणार १५ एप्रिलपासून...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नंदुरबार जिल्ह्यात पपईची कवडीमोल दराने...नंदुरबार : लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य...
जळगाव जिल्ह्यातील बॅंका पीक कर्ज...जळगाव : जिल्ह्यात अपवाद वगळता बॅंकांनी नव्याने...
हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी...हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती...
शब-ए-बारात, डॉ. आंबेडकर जयंतीला घरुनच...मुंबईः सध्या ‘कोरोना’ने सर्वत्र धुमाकूळ घातला...
खासगी डेअरीची संकलन यंत्रणा तोकडी;...नांदेड ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
नाशिक बाजार समितीमध्ये केवळ लिलावाला...नाशिक : ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या...
पुणे, मुंबईत भाजीपाल्याची घरपोच सुविधा पुणे ः शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला पुरवठा...
पुसदमध्ये शेतकरी कंपन्यांतर्फे...यवतमाळ : ‘लॉकडाऊन’च्या पार्श्‍वभूमीवर पुसद येथे...
लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक...चापोली, जि. लातूर : ‘कोरोना’चा फैलाव...
कोरोना’च्या संकटामुळे माळेगावचे गाळप...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...