Marathi Agri agricultural News electricity board take Initiative facilitate power supply Pune Maharashtra | Agrowon

आपत्तीतही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘प्रकाशदुतां’चा पुढाकार

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

पुणे  : ‘कोरोना’च्या आपत्तीमध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी काम करणाऱ्या महावितरणच्या प्रकाशदुतांना गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने मोठे आव्हान दिले आहे. वादळी पावसामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरणचे अभियंते आणि जनमित्रांनी युद्धपातळीवर वीज यंत्रणा दुरुस्तीचे काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला.

पुणे  : ‘कोरोना’च्या आपत्तीमध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी काम करणाऱ्या महावितरणच्या प्रकाशदुतांना गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने मोठे आव्हान दिले आहे. वादळी पावसामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरणचे अभियंते आणि जनमित्रांनी युद्धपातळीवर वीज यंत्रणा दुरुस्तीचे काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला.

पुणे जिल्ह्यातील अनेक भागात मंगळवारी (ता. २४) मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या दोन्ही शहरांतील विविध भागांत वीजपुरवठा खंडित झाला. तो सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अभियंते व जनमित्रांनी युध्दपातळीवर दुरुस्तीचे काम सुरु केले. बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत केल्यानंतर पुन्हा दुपारी दीडनंतर सायंकाळपर्यंत पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागांसह मुळशी, वेल्हे, बारामती, पुरंदर, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, दौंड, भोर व इंदापूर तालुक्यांमध्ये वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातले. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्यामुळे विजेचे खांब व तारा जमीनदोस्त झाल्या. महामार्गांच्या बाजूला असलेल्या मोठमोठ्या जाहिरात फलकांचे बॅनर्स फाटून ते तारांवर जाऊन अडकले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३३ केव्ही, २२ केव्ही आणि ११ केव्ही या मुख्य वीज वाहिन्यांच्या उन्हामुळे तापलेल्या डिस्क व पीन इन्सूलेटरवर पाणी पडल्याने त्या फुटल्या. पुणे शहरात विविध ठिकाणी यापूर्वी झालेल्या खोदकामांमध्ये महावितरणच्या भूमिगत वाहिन्यांचे नुकसान झाले होते. त्यात या पावसाचे पाणी गेल्याने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. वादळी पावसामुळे पुणे जिल्ह्यात सुमारे ३५ ते ४० वीज वाहिन्यांवरील वीजपुरवठा खंडित झाला.

बुधवारी पहाटेच्या सुमारास अभियंते व जनमित्र वीजयंत्रणा दुरुस्तीच्या कामास लागले. सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. ज्या ठिकाणी ही व्यवस्था नाही तेथे प्राधान्याने वीज यंत्रणा दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले. ‘कोरोना’मुळे दुरुस्तीच्या इतर कामांसाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने जनमित्रांनी स्वतःच वीजयंत्रणेवर पडलेल्या फांद्या काढणे, वीजतारांना अडकलेले पातळ पत्रे, बॅनर्स काढणे, वीज खांब उभारणे, तारा ओढणे, नादुरुस्त भूमिगत वीजवाहिन्यांसाठी खोदकाम आणि दुरुस्ती, फिडर पिलर्सची दुरुस्ती आदी कामे करून वीज पुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य दिले. विशेष म्हणजे बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्वच मुख्य वीजवाहिन्यांवरुन वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता.

पावसामुळे वीजपुरवठा खंडीत होत असल्याने प्रथम पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र हा पर्याय नसल्यास वीज यंत्रणा दुरुस्त होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...