पुणे जिल्ह्यात १५ कोरोना विषाणूबाधित रुग्ण ः विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यास जी जबाबदारी देण्यात आलेली आहे, त्यानुसार त्यांनी ती पार पाडावी. आवश्यक तेथे मागणीनुसार रुग्णवाहिका सुसज्ज ठेवाव्यात. वैद्यकीय साधनसामग्रीच्या मागणी व साठ्याबाबत आढावा घेण्यात यावा. वैद्यकीय विभागांना आवश्यक तेथे पोलिस विभागाने सहकार्य करावे. रहिवासी सोसायट्यांमधील नागरिकांमध्ये ‘कोरोना’बाबत जनजागृती करण्यात यावी. - नवल किशोर राम, जिल्हाधिकारी
डॉ. दिपक म्हैसेकर
डॉ. दिपक म्हैसेकर

पुणे   : सध्या जिल्ह्यात १५ कोरोना विषाणूबाधित रुग्ण आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. १६ जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आतापर्यंत आढळलेले `कोरोना`बाधित रुग्ण हे परदेशातून आलेले वा परदेशातून आलेल्यांच्या संपर्कात आलेले होते. पण, नव्याने पाच जणांचे अहवाल आले आहेत. यातील चार जण कुठेही फिरण्यास गेलेले नव्हते. हे सर्व कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. या पाच पैकी एक जण थायलंडमधून परत आला आहे. ही व्यक्ती ९३ नागरिकांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली होती. त्यामुळे आता प्रशासनाने त्या ग्रुपमधील इतरांचा शोध घेण्याचे कार्य हाती घेतले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली.

‘कोरोना’ संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत रविवारी (ता. १५) आढावा बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त  शेखर गायकवाड, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल आदी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, की पुणे शहरातील काही भागात १४४ कलम लावण्याचा विचार सुरू आहे. पुण्यातील ओपन पार्क बंद करण्यात येणार आहेत. वसतिगृहात जे विद्यार्थी राहत आहेत. त्यांना बाहेर काढण्याच्या कुठल्याही सूचना नाहीत. परीक्षा होईपर्यंत हे विद्यार्थी वसतिगृहातच राहतील. सरकारने मॉल्स बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पण, मॉल्समधील मेडिकल, भाजीपाला आणि किराणा साहित्यांची दुकाने सुरू राहतील. याशिवाय कुठलेही दुकान सुरू ठेवले जाणार नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com