नगर कोरोनाबाधितांची संख्या झाली ५३

नगर ः जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना आटोक्‍यात येत असताना शुक्रवारी एकाच दिवसांत आणखी सात जणांना कोरोनाची लागण झाली. तर, शनिवारी संगमनेरमधील मृत पावलेल्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बाधितांच्या संख्येने अर्धशतक पार केले आहे. नव्याने आढळलेले सर्व रुग्ण संगमनेर परिसरातील असल्याने संगमनेरसह कुरण व धांदरफळ हा परिसर सीलबंद करीत २२ मेपर्यंत हॉटस्पॉट घोषित करण्यात आला आहे. हे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
संग्रहित छायाचित्र

जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले चार अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यात जामखेड येथील तरुणाचा चौदा दिवसांनंतरचा व संगमनेर येथील मृत व्यक्ती असा दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. संगमनेर येथील एक महिला व धांदरफळ येथील चार जण, असे पाच जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यानंतर अवघ्या काही तासांतच उर्वरित पाच व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. यात दोन व्यक्ती बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात एकूण ७ रुग्ण आढळून आले.

अहवालानुसार बाधित व्यक्तींमध्ये २८ वर्षीय महिला व पाच वर्षीय मुलाचा समावेश आहे. हे दोन्ही बाधित धांदरफळ येथील आहेत. दरम्यान, बाधित व्यक्ती गुरुवारी (ता. ७) संगमनेर येथे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक आहेत. त्याच मृत व्यक्तीचा शनिवारी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५३ झाली आहे.   अत्यावश्‍यक सेवा, वस्तूंच्या विक्रीला बंदी संगमनेर शहरातील अनेक क्षेत्र हॉटस्पॉट घोषित केले आहेत. दोन किलोमीटरचा परिसर हा कोअर एरिया म्हणून घोषित केला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्‍यक सेवा, वस्तू विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नगर जिल्ह्याची स्थिती

  • १७२५ व्यक्तींची तपासणी
  • ५३ रुग्ण पॉझिटिव्ह
  • १६०८ रुग्ण  निगेटिव्ह
  •  ५३ रुग्ण निरीक्षणाखाली
  • ४५६ जण होम क्वारंटाइन
  • ३४ अहवाल येणे बाकी
  • ३४ रुग्णांना घरी पाठवले. डिस्चार्ज
  • ०४ जणांचा मृत्यू
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com