Marathi Agri agricultural News final year examination of Diploma in Agriculture canceled Pune Maharashtra | Agrowon

कृषी पदविका, तंत्रनिकेतनच्या अंतिम वर्षाची परीक्षा रद्द

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 जुलै 2020

पुणे  : राज्यातील कृषी पदविका व तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेने घेतला.

पुणे  : राज्यातील कृषी पदविका व तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेने घेतला.

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या वेळी कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम, परिषदेचे महासंचालक विश्‍वजित माने, कृषी आयुक्त सुहास दिवसे उपस्थित होते. कृषी पदविकाधारकांची परीक्षा जुलैमध्ये होणार होती. परंतू ‘कोरोना’ची साथ असल्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय परिषदेने घेतला. या विद्यार्थ्यांचे आता गेल्या वर्षभरातील अंतर्गत गुणांचे मूल्यमापन होईल. यंदाच्या वर्षातील अंतर्गत परीक्षेचे गुण आणि गेल्या दोन वर्षांतील मिळालेल्या गुणांच्या सरासरीवर आधारित गुण घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. या निर्णयाचा फायदा २३० कृषी विद्यालयातील दहा हजार विद्यार्थ्यांना होणार आहे.

काष्टी (मालेगाव, जि. नाशिक) येथे कृषी व्यवस्थापन महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच साकोलीमध्ये कृषी महाविद्यालय उभारण्याच्या शासनाच्या आधीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.  

कृषी पदवीधर युवा शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप ननावरे याबाबत म्हणाले, की ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर परीक्षेबाबत संभ्रम होता. पालक चिंतेत होते. संघटनेकडे हा प्रश्‍न आल्यानंतर मंत्र्यांना या प्रश्‍नाची तीव्रता निवेदनाच्या माध्यमातून सांगितली गेली होती. राज्य शासनाचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हिताचा आहे.


इतर अॅग्रो विशेष
टोमॅटोवर जिवाणूजन्य ठिपक्या रोगाचा...नाशिक: चालू वर्षी टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ५०...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील उपयुक्त...
परस्पर पुनर्गठन केल्याने शेतकरी...दानापूर, जि. अकोला ः येथील सेवा सहकारी सोसायटीने...
राज्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीचे...पुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी लॉकडाउन आणि...
शेतमाल नियमनमुक्ती : आहे मनोहर, तरी... पुणे ः संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीचे स्वागतच आहे....
कृषी सुविधा निधीला आजपासून प्रारंभनवी दिल्ली ः कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या...
बाजार समित्यांपुढे स्पर्धेचे आव्हान पुणे ः केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक बाजार'...
धक्कादायक, सरकारी समित्यांमध्ये ...पुणे: पीकविमा योजनेसहित कृषी योजने संबंधित सर्व...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या...पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा...
उमाताईंनी मिळवली आयुष्याची भाकरी गाडीवर फिरून ज्वारीच्या कडक भाकरीची विक्री करत...
गुणवत्ता अन् विश्वासाचा ब्रॅण्ड ः...प्रथम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार सीताफळ उत्पादक...
सर्व शेतीमाल संपूर्ण नियमनमुक्त ! ‘एक...पुणे ः सर्व शेतीमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायमकोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या...
दूध दराच्या दुखण्यावरील इलाजहल्लीच झालेल्या दोन आंदोलनात दूध दराच्या दोन...
‘रेपो रेट’शी आपला काय संबंध?भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) ऑगस्ट,...
आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...