Marathi Agri agricultural News get five crore for incomplete irrigation projects Satara Maharshtra | Agrowon

सातारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी मिळावेत ५०५ कोटी रुपये

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

सातारा  : राज्याच्या अर्थसंकल्पातून जिल्ह्यातील विविध ११ प्रकल्पांसाठी ५०५ कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी पाटबंधारे विभागाने केली आहे. यामध्ये सर्वाधिक १४५ कोटींचा निधी तारळी प्रकल्पासाठी, तर सर्वांत कमी एक कोटीचा निधी निवकणे प्रकल्पासाठी मागणी करण्यात आला आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लागणार आहेत. 

सातारा  : राज्याच्या अर्थसंकल्पातून जिल्ह्यातील विविध ११ प्रकल्पांसाठी ५०५ कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी पाटबंधारे विभागाने केली आहे. यामध्ये सर्वाधिक १४५ कोटींचा निधी तारळी प्रकल्पासाठी, तर सर्वांत कमी एक कोटीचा निधी निवकणे प्रकल्पासाठी मागणी करण्यात आला आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लागणार आहेत. 

जिल्ह्यातील बहुतांशी सिंचन प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. काहींचे पुनर्वसन, तर काहींचे कालवे इतर बांधकामे अपूर्ण आहेत. प्रत्येक वेळी निधीची टंचाई राहिल्याने मुदत वाढत गेल्याने प्रकल्पांची सुधारित किंमत झाली. त्यानुसार प्रत्येक वेळी सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन निधी मागणी करण्यात आली. आता काही प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत, तसेच राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार असून, जिल्ह्यातील दुष्काळ हटविण्यासोबतच सिंचन व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. मात्र त्यासाठी अपेक्षित निधी उपलब्ध करून देणे हे राज्य शासनावर अवलंबून आहे.

सोमवारपासून (ता. २४) विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध होईल अशी आशा आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाने यापूर्वी आपली प्रकल्पनिहाय मागणी शासनाकडे नोंदविली आहे. मागील महायुती शासनाच्या काळात जिहे- कठापूर आणि उरमोडीच्या कामांसाठी थोडाफार निधी उपलब्ध झाला होता. मात्र आता महाविकास आघाडीच्या काळात या दोन योजनांना किती निधी मिळणार याची उत्सुकता आहे. 
 
अशी आहे निधीची मागणी
पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील अकरा प्रकल्पांसाठी एकूण ५०५ कोटींचा निधीची मागणी केली आहे. यामध्ये तारळीसाठी १४५ कोटी, धोम- बलकवडीसाठी २८.७६, उरमोडीसाठी ८०, जिहे- कठापूरसाठी ८०, कुडाळीसाठी ७२, वांगसाठी २२, मोरणा- गुरेघरसाठी ३०, धनगरवाडी उपसा सिंचन योजनेसाठी १७, हणबरवाडी उपसा सिंचन योजनेसाठी १७, कवठे- केंजळ उपसा सिंचन योजनेसाठी १३, निवकणे योजनेसाठी एक कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे.


इतर ताज्या घडामोडी
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ओवाळली आरतीअकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात केळी...नांदेड : लॅाकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे....
मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा व्हावा,...
आंब्याची वाहतूक, वितरण व्यवस्थेतील...मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे...
कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला...कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे...
मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ‘कृषी’च्या...नाशिक: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
खानदेशात कडब्याच्या दरांवर दबाव जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा...
मदत व पुनर्वसन मंत्री देणार ४० हजार...चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार...
खानदेशात धान्याची शिवार खरेदी, मार्केट...जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे....
भंडारा बॅंक देणार १५ एप्रिलपासून...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नंदुरबार जिल्ह्यात पपईची कवडीमोल दराने...नंदुरबार : लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य...
जळगाव जिल्ह्यातील बॅंका पीक कर्ज...जळगाव : जिल्ह्यात अपवाद वगळता बॅंकांनी नव्याने...
हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी...हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती...
शब-ए-बारात, डॉ. आंबेडकर जयंतीला घरुनच...मुंबईः सध्या ‘कोरोना’ने सर्वत्र धुमाकूळ घातला...
खासगी डेअरीची संकलन यंत्रणा तोकडी;...नांदेड ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
नाशिक बाजार समितीमध्ये केवळ लिलावाला...नाशिक : ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या...
पुणे, मुंबईत भाजीपाल्याची घरपोच सुविधा पुणे ः शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला पुरवठा...
पुसदमध्ये शेतकरी कंपन्यांतर्फे...यवतमाळ : ‘लॉकडाऊन’च्या पार्श्‍वभूमीवर पुसद येथे...
लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक...चापोली, जि. लातूर : ‘कोरोना’चा फैलाव...
कोरोना’च्या संकटामुळे माळेगावचे गाळप...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...