Marathi Agri agricultural News to give in advance payment of five schemes Beneficiaries mumbai Maharashtra | Agrowon

पाच योजनांच्या ३५ लाख लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे आगाऊ मानधन ः मंत्री धनंजय मुंडे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 एप्रिल 2020

मुंबई  : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार,  श्रावणबाळ व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन,  इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन,  तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन अशा पाच योजनांच्या राज्यातील सुमारे ३५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना एप्रिल,  मे आणि जून या तीन महिन्यांचे मानधन एकत्रित आगाऊ देण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानासुद्धा त्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत १२५७ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून,  अर्थ व नियोजन विभागाने त्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

मुंबई  : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार,  श्रावणबाळ व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन,  इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन,  तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन अशा पाच योजनांच्या राज्यातील सुमारे ३५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना एप्रिल,  मे आणि जून या तीन महिन्यांचे मानधन एकत्रित आगाऊ देण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानासुद्धा त्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत १२५७ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून,  अर्थ व नियोजन विभागाने त्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

या योजनांच्या अंतर्गत राज्यात संजय गांधी निराधार योजनेतून ११ लाख १५ हजार लाभार्थ्यांना प्रतिमहिना १ हजार रुपये,  श्रावणबाळ सेवा योजनेतून ११ लाख ७२ हजार लाभार्थ्यांना प्रतिमहिना १ हजार रुपये मानधन राज्य शासनाच्या वतीने दिले जाते. आता ‘कोरोना’मुळे सुरु असलेल्या संचारबंदीच्या काळात एप्रिल,  मे व जून य तीन महिन्यांचे मानधन एकत्रित देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर केंद्र सरकार पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत ६५ ते ७९ वयोगटातील दहा लाख ७३ हजार लाभार्थ्यांना प्रतिमहिना एक हजार रुपये मानधन यामध्ये ८० टक्के म्हणजेच प्रतिव्यक्ती आठशे रुपये इतका वाटा राज्य शासनाचा असतो,  तर ८० व त्यावरील वयोगटाच्या ६८ हजार तीनशे लाभार्थ्यांना प्रतिमहिना १ हजार रुपये,  यामध्ये ५० टक्के म्हणजे पाचशे रुपये राज्य शासनाचा वाटा असतो. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या ७० हजार पाचशे लाभार्थ्यांना प्रतिमहिना १ हजार ज्यामध्ये ७० टक्के म्हणजे प्रति लाभार्थी ७०० रुपये राज्य सरकारचे आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना ज्यामध्ये राज्यात १० हजार तीनशे लाभार्थी असून त्यांच्या प्रतिमहिना १ हजार रुपये मानधनांपैकी ७० टक्के वाटा राज्य सरकार देते.

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या एकूण परिस्थितीमुळे केंद्र सरकारने या तीनही योजनेतील लाभार्थींना एप्रिल,  मे व जून या तीन महिन्यांचे मानधन एकत्रित एप्रिल महिन्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनाच्या दोन्ही योजनांच्या लाभार्थींनाही तीन महिण्याचे एकत्रित मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, राज्यातील गरीब, वंचित,  वार्षिक उत्पन्न रुपये २१ हजार पेक्षा कमी असलेले वृद्ध,  निराधार,  अंध,  दिव्यांग,  विधवा,  परित्यक्त्या,  देवदासी अशा उपेक्षितांची या कठीण काळात परवड होऊ नये यासाठी राज्य शासनाच्या इतर विभागांच्या बरोबरीने सामाजिक न्याय विभाग भक्कमपणे या नागरिकांच्या पाठीशी उभा असून, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमधून राज्यातील जवळपास ३५ लाख लाभार्थींना तीन महिन्यांचे एकत्रित मानधन देऊन त्यांच्या जीवनावश्यक वस्तू तथा आरोग्यविषयक सुविधांची गरज पूर्ण व्हावी हा हेतू राज्य शासनाचा असून त्यासाठी १२५७ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत जिल्हानिहाय निधी वितरणाची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरु होणार असून लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यांवर एकत्रित हे मानधन वितरित करण्यात येईल; असे श्री. मुंडे यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...