Marathi Agri agricultural News government gives extension to chief secretary Mumbai Maharashtra | Agrowon

मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

मुंबई  : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे मेहता हे सरकारच्या सेवेत जूनपर्यंत कार्यरत राहतील.

मुंबई  : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे मेहता हे सरकारच्या सेवेत जूनपर्यंत कार्यरत राहतील.

राज्यात उदभवलेल्या कोरोना विषाणच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २३ मार्चला केंद्र सरकारला पत्र लिहून श्री. मेहता यांना तीन महिने मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती. केंद्र सरकारने ही विनंती मान्य केली असून यासंदर्भातील पत्र सामान्य प्रशासन विभागाला पाठवले आहे.

अजोय मेहता हे नियत वयोमानानुसार सप्टेंबर २०१९ मध्ये सेवानिवृत्त झाले. मात्र, तत्कालीन राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्री. मेहता यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळवून दिली. त्यानुसार श्री. मेहता यांचा कार्यकाळ येत्या ३१ मार्चला संपणार होता. सध्या कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे श्री. मेहता यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला आहे.

या निर्णयामुळे मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत असलेले अतिरिक्त मुख्य सचिव संजयकुमार, प्रविणसिंह परदेशी आणि सीताराम कुंटे यांना आता जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
माती परीक्षणानुसार करा खतांचे नियोजनमाती परीक्षण हा पीक उत्पादनाचा आत्मा आहे. आगामी...
सुधारित तंत्राने करा शेवगा लागवडलागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील अंतर २.५ ते ३...
भात पुर्नलागवडीची चारसूत्री पद्धतीसूत्र १  भातपिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व...
हिंगोलीत हळद ४८०० ते ५२०० रुपये...हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
संतुलित खत व्यवस्थापनावर द्या भरमाती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती...महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
मांडा ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रकआपल्या गावाचा ग्रामविकास आराखडा आपण सर्वांनी...
नाशिकमध्ये दोडका ३३३५ ते ४५८५ रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
राज्यात टोमॅटो ५०० ते २५०० रूपये...सांगलीत १ हजार ते १२५० रूपये दर सांगली  ः...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...