Marathi Agri agricultural News government should give subsidy to onion producers Nashik Maharashtra | Agrowon

राज्य सरकारने कांदा उत्पादकांना अनुदान द्यावे ः राज्यमंत्री बच्चु कडू

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

नाशिक ः राज्य सरकारने जबाबदारी घेऊन प्रतिक्विंटल मागे ३००ते ५०० रुपये अनुदान कांदा उत्पादकांना द्यावे, अशी मागणी राज्यमंत्री बच्चु कडू यांनी केली आहे.

नाशिक  : कांदा हे पीक दरवर्षी कोणत्या ना कोणत्या अडचणीत सापडते. त्यास केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी दराने उन्हाळ कांदा विकावा लागत असल्याने शेतकरी अडचणीत आहे. केंद्र सरकार करेल तेव्हा पाहू, मात्र राज्य सरकारने जबाबदारी घेऊन प्रतिक्विंटल मागे ३००ते ५०० रुपये अनुदान कांदा उत्पादकांना द्यावे, अशी मागणी राज्यमंत्री बच्चु कडू यांनी केली आहे.

जिल्ह्यातील येवला,चांदवड, निफाड व नाशिक तालुक्यातील प्रहार शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्री श्री.कडू यांची कुरळ पूर्णा (जि.अमरावती) येथे शनिवारी(ता.१) भेट घेऊन कांदा उत्पादकांची स्थिती मांडली. यावेळी उपजिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर,जिल्हाप्रमुख शरद शिंदे,येवला तालुकाप्रमुख हरिभाऊ महाजन,किरण चरमळ,रेवण गांगुर्डे,चांदवड तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण,दीपक जाधव संदीप जाधव आदी उपस्थित होते.

कांदा खाल्ला नाही तर कोणी मरत नाही; मग कांद्यावर विनाकारण नियंत्रण का, असा सवाल श्री. कडू यांनी यावेळी उपस्थित केला. श्री.कडू यांनी जिल्ह्यातील काही बाजार समित्यांना फोन करून कांदा दराची स्थिती विचारली. त्यावेळी ५ ते ६ रुपये प्रतिकिलो दर कांद्याला मिळत असल्याचे वास्तव त्यांच्या समोर आले. ही बाब कांदा उत्पादकांसाठी तोट्याची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या मंगळवारी कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे हा प्रश्न मांडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

‘खराब कांद्याला भरपाई मिळवून देणार’ 
हवामान बदल व कांद्याची टिकवण क्षमता कमी झाल्यामुळे कांदा उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. चाळींमधील खराब झालेल्या कांद्याचे पंचनामे करून, उत्पादकांना योग्य मोबदला व नुकसान भरपाई कशी देता येईल, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चर्चा करु, असा शब्द श्री.कडू यांनी यावेळी दिला.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...