हिंगोली जिल्ह्यात पोकराअंतर्गत ६ कोटींचे अनुदान वितरित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

हिंगोली ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत (पोकरा) फळबाग लागवड, बंदिस्त शेळीपालन, सामुदायिक शेततळे आदी घटकांसाठी २५७२ लाभार्थी शेतकऱ्यांना ५ कोटी ९६ लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले. त्यात २२०० वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी बळीराम कच्छवे यांनी दिली.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत जिल्ह्यात तीन टप्प्यात मिळून हिंगोली तालुक्यातील ५१, कळमनुरी तालुक्यातील ४६, वसमत तालुक्यातील ४६, औंढा नागनाथ तालुक्यातील ४७, सेनगाव तालुक्यातील ५० अशा जिल्ह्यातील एकूण २४० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील १८ हजार ७६३ शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी ४० हजार ३४२ अर्ज केले. त्यापैकी १४ हजार ७१ शेतकऱ्यांची पडताळणी करण्यात आली.

या योजनेच्या अंमलबजावणीतील कामगिरीबद्दल शुक्रवारी (ता. १०) औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पातील कार्यक्रमात कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्या हस्ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, उपविभागीय कृषी अधिकारी बळिराम कच्छवे यांचा सत्कार करण्यात आला.   योजनेतून लाभार्थ्यांना केलेले अनुदानवाटप आजवर फळबाग लागवड योजनेअंतर्गत ६७ लाभार्थ्यांना ३५ लाख रुपये, बंदिस्त शेळीपालनासाठी १९ लाभार्थ्यांना ७ लाख रुपये, वैयक्तिक शेततळ्यांसाठी २ लाभार्थींना १ लाख रुपये, सामुदायिक शेततळ्यासाठी ५ लाख ३३ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले. नवीन विहिरींसाठी ११ लाभार्थ्यांना २७ लाख ५० हजार रुपये, ठिबक संचासाठी २२६ लाभार्थ्यांना १ कोटी २१ लाख १५ हजार रुपये, तुषार सिंचन सिंचनासाठी ५८७ लाभार्थ्यांना ९९ लाख २७ हजार रुपये, पाइपसाठी १ हजार ७० लाभार्थ्यांना १ कोटी ९२ लाख ९० हजार रुपये, पंपसंचासाठी ५६० लाभार्थ्यांना ७६ लाख ५८ हजार रुपये, नाडेप खत निर्मितीसाठी ३ शेतकऱ्यांना १६ लाख रुपये, बिजोत्पादनासाठी २ लाख रुपये आदी मिळून एकूण २५७२ शेतकऱ्यांना ५ कोटी ६९ लाख ४ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com