Marathi Agri agricultural News Jillha parishad will purchase kit Pune Maharashtra | Agrowon

पुणे जिल्हा परिषद करणार पीपीई कीट खरेदी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

पुणे  : जिल्ह्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक संरक्षण साहित्य (पीपीई कीट) खरेदी करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुणे  : जिल्ह्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक संरक्षण साहित्य (पीपीई कीट) खरेदी करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक सामग्री आणि औषधांची तातडीची खरेदी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्यानुसार सुमारे साडेचार कोटी रुपयांचे वैयक्तिक संरक्षण साहित्य (पीपीई कीट), मास्क, सॅनिटायझर, थर्मामीटर आदी बाबींची खरेदी करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधीतून हे वैद्यकीय साहित्य आणि औषधांची खरेदी केली जाणार आहे.

यामध्ये ४९ लाख ५० हजार रुपयांचे पीपीई कीट, ३३ लाख ६० हजार रुपयांचे एन-९५ मास्क, ५२ लाख ६८ हजार रुपयांचे सॅनिटायझर, २४ लाख रुपयांचे तीन पदरी मास्क, २२ लाख ५० हजार रुपयांचे संपर्कविरहित थर्मामीटर, १ लाख ९ हजार रुपयांचे व्हीटीएम कीट आणि दोन कोटी ४६ लाख ३८ हजार ९२० रुपयांची औषधे खरेदी केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना या वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा केला जाणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...