Marathi Agri agricultural News meeting of coir board Nashik Maharashtra | Agrowon

काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला चालना शक्य ः विनय सहस्त्रबुध्दे

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 जुलै 2020

नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर आहे. मात्र नारळ वगळता इतर टाकाऊ घटकांवर प्रक्रिया होत नसल्याने संधी असूनही दुर्लक्ष झाले. आंध्र प्रदेश, केरळ वगळता इतर राज्यांमध्ये याबाबत मोठे काम उभे राहिलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील नारळ उत्पादनाचा आढावा घेतल्यास काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला नवी चालना मिळणे शक्य असल्याचे मत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले. 

नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर आहे. मात्र नारळ वगळता इतर टाकाऊ घटकांवर प्रक्रिया होत नसल्याने संधी असूनही दुर्लक्ष झाले. आंध्र प्रदेश, केरळ वगळता इतर राज्यांमध्ये याबाबत मोठे काम उभे राहिलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील नारळ उत्पादनाचा आढावा घेतल्यास काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला नवी चालना मिळणे शक्य असल्याचे मत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले. 

सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या कॉयर बोर्डाची बैठक शुक्रवारी (ता.३) झाली. या वेळी राज्यसभा प्रतिनिधी म्हणून श्री. सहस्त्रबुद्धे सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी हे व्यक्त केले. बैठकीला कॉयर बोर्डाचे अध्यक्ष सुधीर गर्ग, केरळ सरकारच्या प्रतिनिधी अंजू जॉर्ज, सदस्य प्रभू सुंदर राजन, गोविंद नटराजन आदी सहभागी होते.

सहस्त्रबुद्धे म्हणाले, की फक्त ४१ टक्के नारळातील टाकाऊ घटक सोडणं काथ्या तयार करण्यासाठी वापरले जाते. महाराष्ट्रात कोकणामध्ये अवघ्या १६ सोडणं या टाकाऊ घटकांचा वापर होतो. त्यामुळे देशासह राज्यात याबाबत जनजागृती नसल्याने महत्त्वाचा घटक उपयोगात येत नाही. काथ्यापासून सतरंज्या, पायपुसणी उत्पादित होतेच; मात्र आता विटाही बनतात. रस्ताबांधणीत त्याचा उपयोग करण्याचे धोरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वीकारले आहे. काथ्या उद्योगावर भर दिल्यास रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. याबाबत तळकोकणात उद्योग उभे राहिले, तर रोजगार वाढेल, असा दावा त्यांनी केला. 
 
प्रशिक्षण केंद्राची केली मागणी 
कॉयर बोर्डाकडे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची मागणी श्री. सहस्त्रबुद्धे यांनी केली. या माध्यमातून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने काम उभे केले जाईल. यातून नारळ उत्पादक, बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण व रोजगारनिर्मितीसाठी मार्गदर्शन मिळेल. निसर्ग चक्रीवादळामुळे जे नुकसान झाले आहे. या प्रयोगातून येथे पुनर्वसन शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...