अमरावतीत गरजूंना स्वयंसेवी संस्थांकडून अन्नदान 

अमरावती ः कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रवासी नागरिकांचे स्थलांतर रोखण्यावर भर दिला आहे. या मोहिमेला स्वयंसेवी संस्थांचे देखील पाठबळ मिळत असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. संचारबंदी आदेशामुळे शहरात असलेल्या बेघर, मजुरी करुन पोट भरणारा वर्ग, रुग्ण व त्यांचे नातेवाईक अशा विविध वर्गातील घटकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी या संस्था पुढे येत आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रवासी नागरिकांचे स्थलांतर रोखण्यावर भर दिला आहे. या मोहिमेला स्वयंसेवी संस्थांचे देखील पाठबळ मिळत असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. संचारबंदी आदेशामुळे शहरात असलेल्या बेघर, मजुरी करुन पोट भरणारा वर्ग, रुग्ण व त्यांचे नातेवाईक अशा विविध वर्गातील घटकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी या संस्था पुढे येत आहेत. 

नानक रोटी ट्रस्टच्या वतीने १ हजार थाळ्यांचे वितरण गरजूंना केले जात आहे. गणेश थवराणी, राजुभाई दुर्गाई, शंकर ओटवानी, मनोज पुरस्वानी, संदीप हासानी, नारायण छेडानी, हेमंत होतलानी, हरीश बजाज, रेवाचंद बजाज अशी अनेक मंडळ सेवाभावी वृत्तीतून कार्य करीत आहेत. श्री जलाराम सत्संग मंडळाच्या वतीने गेल्या ३६ वर्षांपासून रामरोटीचे वितरण होत आहे.

सध्याच्या आपत्तीच्या काळात मंडळांकडून ५०० जणांना भोजन वितरित केले जात आहे. मंडळाचे अध्यक्ष दिलीप पोपली, हर्षद कारिया, राजू आडतिया, जयेश राजा, राजू राईचुरा, कांतीभाई कारिया, अनिल पंड्या, हर्षद सेठिया, लालचंदभाई गुप्ता, अजय आडतिया, कुंदन महराज, संजय महाराज, ध्रुव कारिया, दर्शन कारिया, ध्रुवभाई दोषी, सुरेंद्र पोपली, सतीश कुकरेजा, राजेश बुलानी, विजय पजवानी, हरीश सुंदरानी या सर्वांचे या कामात सहकार्य असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात जलाराम ग्रुपच्या वतीने, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उमेश पनपालिया, सीमेश श्रॉफ मित्रमंडळाच्यावतीने, जिल्हा स्त्री रुग्णालयात गुरुव्दारा समितीतर्फे, बडनेरा रस्त्यावरील महेशभवन येथे बालाजी मंदिर ट्रस्टतर्फे, भक्‍तीधाम येथे जयेश राजा यांच्यावतीने, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात हरिना फौंडेशन व रोटरी क्‍लब, वलगाव येथे महेश्‍वरी पंचायतीतर्फे, दस्तुरनगर चौकातील पोफळीभवन येथे जेसीआयतर्फे, शेल्टरहोममध्ये हॉटेल असोसिएशनकडून, ख्रिश्‍चन अँड मिशनरी अलायन्स येथे टी.एस.लव्हाळे यांच्यातर्फे गरजूंना स्वखर्चाने भोजन पुरविण्यात येत आहे. या संस्थांना कोणतीही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी अजय लहाने यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com