अंतिम गुणपत्रिकांवर नसणार ‘प्रमोटेड कोविड-१९’ उल्लेख 

पुणे : कृषी पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम गुणपत्रिका देताना ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा उल्लेख केला जाणार नाही, असे कृषी विद्यापीठांनी स्पष्ट केले. तसेच, एका महाविद्यालयाने सत्र मूल्यमापन पत्रिकेत असा परस्पर केलेला उल्लेख हटविण्याचे आदेश डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिले आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : कृषी पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम गुणपत्रिका देताना ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा उल्लेख केला जाणार नाही, असे कृषी विद्यापीठांनी स्पष्ट केले. तसेच, एका महाविद्यालयाने सत्र मूल्यमापन पत्रिकेत असा परस्पर केलेला उल्लेख हटविण्याचे आदेश डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिले आहेत. 

कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी सांगितले, की अंतर्गत मूल्यमापनासाठी तयार केलेल्या कागदपत्रांमध्ये एका महाविद्यालयाने चुकून ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा उल्लेख परस्पर केला. त्याबाबत मला देखील पूर्वकल्पना नव्हती. कृषिमंत्री, कृषी परिषद किंवा अधिष्ठाता समितीने देखील तसा काहीही निर्णय घेतलेला नव्हता. मात्र, एका उल्लेखामुळे गैरसमज वाढले. हा उल्लेख काढून टाकण्याच्या सूचना अधिष्ठाता कार्यालयाला देण्यात आले आहेत. पदवीची अंतिम गुणपत्रिका मुळात कुलसचिवांच्या स्वाक्षरीने तयार होते. त्यात ‘कोविड’बाबत कोणताही उल्लेख केला जाणार नाहीत. विद्यार्थ्यांना कोणतेही असे कागदपत्र किंवा प्रमाणपत्र दिले जाणार नाही की त्यातून विद्यार्थ्याचे नुकसान होईल, असेही डॉ.भाले यांनी स्पष्ट केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण म्हणाले, की गुणपत्रिकांवर शिक्के मारण्याचा कोणताही निर्णय आमच्या विद्यापीठाने घेतलेला नाही. तसेच, इतर देखील विद्यापीठाने तशा सूचना दिल्या नव्हत्या. अकोला कृषी विद्यापीठाच्या कक्षेतील एका महाविद्यालयात परस्पर तसा उल्लेख आल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण होणे स्वाभाविक होते. पण, अनवधानाने ही चूक झाली आहे. विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये. सर्व विद्यापीठे विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काळजी घेत आहेत. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.अशोक फरांदे यांनी देखील अधिष्ठाता समितीने गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड १९’ सूचना दिलेल्या नसल्याचे स्पष्ट केले. “ समितीच्या आत्तापर्यंत सात बैठका झाल्या. हा विषय कधी चर्चेला आलाच नव्हता. उलट विद्यापीठे परीक्षा घेणे, निकाल तयार करणे तसेच नव्या सत्रांना सुरुवात करणे ही कामे वेळेआधीच करीत आहेत. राहुरी विद्यापीठाच्या कक्षेतील विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकांबाबत कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com