पुण्यात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः पुणे शहरात दुबई येथे जाऊन आलेले कोरोना विषाणूचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण नायडू हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी एका रुग्णामध्ये कोरोना विषाणूची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. दुसऱ्या रुग्णामध्ये अद्याप लक्षणे आढळून आलेली नाहीत. 

सदर रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. तथापि नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

पुण्यात मंगळवारी (ता. १०) आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. म्हैसेकर बोलत होते. ते म्हणाले, की दुबई हे ठिकाण केंद्र शासनाने जाहीर केलेल्या बाधित ठिकाणांच्या यादीमध्ये नसल्यामुळे संशयित रुग्ण १ मार्चला भारतात परत आल्यानंतर त्यांचे विलगीकरण करण्यात आले नाही. दोन्ही व्यक्ती भारतात परत आल्यानंतर संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेण्यात आली आहे. दोन्ही महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात २१ ठिकाणी २०७ बेड अतिदक्षता विभागाच्या सुविधा तसेच विलगीकरण कक्षासहित तयार करण्यात आले, असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.   पाच पथकांची निर्मिती या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढण्यासाठी पाच पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये महसूल,आरोग्य, पोलिस आणि दोन्ही महानगरपालिकांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे दोन्ही रुग्ण ज्या विभागांमध्ये किंवा परिसरामध्ये गेले असतील त्या ठिकाणी कोरोना विषाणूबाधित अथवा संशयित रुग्ण आढळून येत असल्यास त्याची खातरजमा या पथकाद्वारे करण्यात येईल, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com